पुण्यात कोरोनाचे एकूण ९ रूग्ण

Share this News:

पुणे, दि.१२-पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण ९ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली.

त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ वर गेली
आहे. या रूग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.