NEET चे स्वागतच, परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यांमधील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करावा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी मंडळ दि.१७ मे २०१६ रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांना भेटले व या वर्षी पासूनच NEET लागू करावी अशी मागणी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री.विनय बिद्रे म्हणाले, “सध्याची परिस्थिती पाहता व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये परिस्थितीनुरूप बदल करण्याची गरज आहे. NEET या वर्षीपासून लागू करण्याचा जो निर्णय यावर्षी देण्यात आला आहे तो वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात चालू असणाऱ्या व्यापारीकरण व भ्रष्टाचार यांना आळा घालणारा असल्याने विद्यार्थी परिषद त्याचे स्वागत करते. NEET चे पहिलेच वर्ष असल्याने NEET १ या परीक्षेस न बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जो NEET २ चा पर्याय देण्यात आला त्याचेही विद्यार्थी परिषद स्वागत करते.”
“अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी मागणी करते की, केंद्रीय प्रवेश परीक्षा NEET ही या वर्षी पासून NEET१ व NEET२ या दोन टप्प्यात ज्याप्रमाणे ठरले आहे त्याप्रमाणे लागू केली जावी, परंतु महाराष्ट्रासारख्या ज्या काही राज्यांमध्ये राज्याची CET घेण्यात आली आहे त्या राज्यांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य तो मार्ग काढावा. परंतु खाजगी महाविद्यालयांना कोणतीही सूट न देता तेथील प्रवेश NEET २०१६ नुसारच व्हावेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थी हिताचा विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा.”