भिडेवाडा – १ जानेवारी  १८४८ – पहिली मुलींची शाळा

Share this News:

बुधवार पेठमधील भिडे वाडा गेले अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे . त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे . या भिडे वाड्याचे जतन करण्यासाठी त्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी करण्यात येत आहे . हा वाडा तात्यासाहेब भिडे यांनी फुले यांना शाळा चालु करण्या करता दिला होता

ज्या काळात महिलांना चार भिंतीच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती, स्रीच आयुष्य म्हणजे फक्त चूल आणि मुलं असा समाजात समज होता . त्या काळात महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण दिले . शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले .त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियासाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते . सुमारे १७० वर्षे पूर्वी

१ जानेवारी १८४८ साली महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यांनी पुण्यात व साताऱ्यात एकूण अठरा शाळा सुरु केल्या. महात्मा फुलेंचे म्हणणे होते की समाजाला शहाणे करायचे असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही .इ.स. १८८२ साली त्यांनी विल्यम हंटर शिक्षण आयोगा समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. इ.स. १८५५ – रात्रशाळेची सुरुवात केली. इ.स. १८५२ – पूना लायब्ररीची स्थापना केली .सावित्री माईंनी समाजाच्या त्रासाला झुगारून आपले शिक्षण कार्य सुरु ठेवले . संनातनी लोकांनी त्यांना दगड फेकून मारली,अंगावर शेण फेकले पण त्यांनी शिक्षणकार्य चालूच ठेवले .

पण आज या सर्व गोष्टीचा साक्षीदार असलेला भिडेवाडा शेवटच्या घटका मोजत आहे . हा वाडा मोडकळीस आला आहे . जेथे स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला ,ज्या वाड्यात स्त्रिया शिकल्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या त्या वाड्याचे केव्हाच राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे होते . या वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे व येथे पुन्हा गरीब मुलानं -मुलीनं साठी शाळा सुरु करण्यात यावी .त्यांचे शिक्षण कार्य अखंड पणे सुरु ठेवणे हीच फुले दाम्पत्यांना खरी श्रद्धांजली .