अतिदुर्गम ‘चांदर’मध्ये आता महावितरणच्याप्रकाशाचं चांदणं
पुणे, दि. 8 मे 2018 : सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्याअतिदुर्गम चांदर (ता. वेल्हे, जि. पुणे) अन् लगतच्या दोन वस्त्यांसाठीअवघ्या सात दिवसांत 65 वीजखांब व एका वितरण रोहित्राचीवीजयंत्रणा उभारत महावितरणने डोंगरदऱ्यातून अक्षरशः ‘प्रकाश’ खेचून आणला आहे. आजवर चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याचीसवय असणाऱ्या चांदर गावासह डिगेवस्ती व टाकेवस्तीमधील घरेहीमहावितरणच्या प्रकाशाने उजळून निघत आहेत
केवळ एका विद्यार्थ्यांसाठी डोंगरदऱ्यातून अडीच- तीन तासप्रवास करून चांदर येथील शाळेत विद्यार्जन करणाऱे शिक्षक श्री. रजनीकांत मेंढे यांच्यामुळे अतिदुर्गम चांदर गावाची माहितीप्रसिद्धीमाध्यमांद्वारे जगाला मिळाली होती. त्या शाळेला सुद्धामहावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्यात आलेली आहे, हे विशेष.
पुणे व रायगड जिल्ह्याच्या सिमेलगत सह्याद्रीच्या घनदाटवनराईच्या डोंगरदऱ्यातील अतिदुर्गम भागात वसलेले चांदर गाव. दोनडोंगराच्या खोल दरीत वसलेले हे 18 घरांचे गाव. बाजूलाच असलेल्याडोंगरमाथ्यावर 10 घरांची टाकेवस्ती व दुसऱ्या डोंगरमाथ्यावर 18 घरांची डिगेवस्ती असा 46 घरांचा परिसर. पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे साडेचार ते पाच तासांच्याप्रवासाचे चांदर गाव हे पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे शेवटचेटोक. दऱ्याखोऱ्यातील घाटरस्त्याने जाताना शेवटचे 15 किलोमीटरभूसभुशीत मातीरस्त्याचे अंतर कापणे चारचाकी वाहनांमध्ये केवळजिप व तत्सम वाहनांखेरीज केवळ अशक्य आहे. चांदर व लगतच्यादोन्ही वस्त्यांचा पावसाळ्यात तर सुमारे 5 ते 6 महिने जगाशी संपर्कतुटलेला असतो. पण डोंगरदऱ्यातील याच गावात महावितरणनेसामाजिक बांधिलकीचे एक नवीन प्रकाशपर्व सुरु केले आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे चांदर गावाची माहितीमिळाली. या गावाला वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक वताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसारमहावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्यामार्गदर्शनात स्थानिक अधिकाऱ्यांनी चांदर गावाची प्रत्यक्षात पाहणीकेल्यानंतर अत्यंत नैसर्गिक व भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीत हे आव्हान किती खडतर आहे याचा अंदाज आला. त्यानंतर दि. 20 एप्रिलला प्रत्यक्षात काम सुरु झाले.
महावितरणने हे आव्हान स्विकारून सामाजिक बांधिलकीजोपासत काम सुरु केले. सुमारे 60 कर्मचारी चांदर परिसरातीलडोंगरदऱ्यात वीजयंत्रणा उभारण्याच्या कामी लागले. सकाळी 9 तेरात्री उशिरापर्यंत वीजयंत्रणा उभारण्यासाठी हे सर्वजण राबत होते. अत्यंत खडतर रस्त्याने सर्वप्रथम वीजखांब, तारा व इतर तांत्रिकसाहित्य एकाच दिवसात आणल्यानंतर प्रत्यक्ष वीजयंत्रणा उभारण्याचेकाम सुरु झाले. यात डोंगर पायथ्याशी असलेल्या निवंगुणे वस्तीजवळील आडमल 22 केव्ही वीजवाहिनीला जोडून डोंगर माथ्यापर्यंतसुमारे 900 मीटर व त्यापुढील डिगेवस्तीजवळील सपाट भागापर्यंतनवीन 29 वीजखांब टाकून 22 केव्ही क्षमतेची सुमारे 1.72 किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनी पूर्णपणे नव्याने उभारण्यात आली.त्यानंतर डिगेवस्तीजवळच 63 केव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्रलावण्यात आले. सलग सात दिवसांच्या अविश्रांत कामानंतर 26 एप्रिलला वितरण रोहित्र व उच्चदाब वाहिनी कार्यान्वित झाली. रोहित्राच्या वीजखांबावर रात्री लखलखणाऱ्या दिव्याने चांदर गावासहदोन्ही वस्त्यांना महावितरणने खेचून आणलेला प्रकाश आता घराच्याउंबरापर्यंत येत असल्याची चाहूल दिली. यावेळी ग्रामस्थांनी साखरवाटून आनंद व्यक्त केला.
त्यानंतर डोंगरमाथ्यावर असलेल्या या रोहित्रामधून तीनवेगवेगळ्या दिशेला असलेल्या चांदर, डिगेवस्ती व टाकेवस्ती येथे 440 व्होल्टच्या लघुदाब वाहिनीद्वारे वीज उपलब्ध करून देण्यात आली. रोहित्राजवळ असलेल्या डिगेवस्तीला 9 खांबावरील वाहिनीद्वारे वीजउपलब्ध करून देण्यात आली. पण हे काम चांदरसाठी सर्वाधिकअवघड ठरले. दुसऱ्या दिशेला सुमारे 1300 मीटर डोंगरदरीतअसलेल्या चांदर गावासाठी डोंगर उतारावर एकूण 17 वीजखांबउभारण्यात आले आणि तिसऱ्या दिशेने असणाऱ्या टाकेवस्तीसाठीसुद्धा स्वतंत्र 10 वीजखांब उभारण्यात आले. त्यानंतर या तीनहीवस्त्यांसाठी नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरु झाली. विशेषम्हणजे सिमेंट कान्क्रीटीकरणासाठी आवश्यक पाण्याचेही दुर्भिक्ष्यअसल्याने व टँकर येणे शक्य नसल्याने बॅरलद्वारे पाणी आणावेलागले. ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी महावितरणला सुमारे 20 लाखरुपये खर्च आला.
वीजपुरवठा यशस्वी सुरळीत झाल्यानंतर पहिल्याच दिवशीचांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्यादेण्यात आल्या. यात चांदरमधील प्राथमिक शाळेसह वीजग्राहकदिनाराम सांगळे यांनी पहिल्या वीजजोडणीचा मान मिळविला. टाकेवस्ती येथे श्री. बबन सांगळे, श्री. तुकाराम बेसावडे यांना तरडिगेवस्ती येथील श्री. नथू कोकरे व श्री. तिमा कोकरे यांना नवीनवीजजोडणी देण्यात आल्या आहेत. घरात उजळलेले विजेचे दिवेपाहून महावितरणचे हे नवीन वीजग्राहक व त्यांच्या कुटुंबियांच्याचेहऱ्यावरील आनंदाचे भाव व निष्पाप, दिलखुलास हास्यानेचशब्दातीत प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. प्रकाशाच्या आगमनाचा आनंदसाखर वाटून साजरा झाला. या वस्त्यांमधील आबालवृद्धांनी घरातविजेवरील दिव्याचा प्रकाश पहिल्यांदाच अनुभवला हेही विशेष.
चांदर गाव व दोन्ही वस्त्यांमध्ये 46 पैकी बहुतांश घरे हीकुडाची माती लेपलेली असल्यामुळे वीजमीटर व सर्व्हीस वायरटाकण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे नवीनवीजजोडणीची प्रक्रिया ही वीजसुरक्षेला प्राधान्य देऊन सुरु आहे. यासोबतच ग्रामस्थांना वीजसुरक्षेबाबतही माहिती देण्यात येत आहे. अतिदुर्गम व डोंगरदऱ्यात चांदर गाव व दोन वस्त्यांमध्येमहावितरणच्या सामाजिक बांधिलकीचे प्रकाशपर्व सुरु केल्याबदद्लमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार वपुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी या कामी योगदानदेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
