कंत्राटदार आणि कर्मचा-यांचे देयकऑनलाईन अदा करणारी महावितरणदेशातील पहिलीच वीज कंपनी
मुंबई, दि. ०४ जुलै २०१८ :-
पारदर्शक आणि तत्पर सेवा देणा–या महावितरणनेदेशाच्या वीज क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.कागदविरहित झालेल्या महावितरणने आता सर्व कंत्राटदारांची देयकेकेंद्रीय प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन अदा करण्यास सुरूवातकेली असून लवकरच कर्मचाऱ्यांची देयकेही ऑनलाईन अदाकरण्यास येणार आहे. अशी सुविधा उपलब्ध करून देणारीमहावितरण ही भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणारआहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.संजीव कुमार यांचा कंपनीच्या कामकाजात संपूर्ण पारदर्शकतेचा वजास्तीत जास्त ऑनलाईनचा आग्रह असून कंत्राटदार, पुरवठादारयांच्यासोबत कर्मचा–यांनाही त्यांची देयके मिळण्यासाठी कुठेहीअडचण होऊ नये यावर त्यांचा विशेष भर आहे. आधुनिक माहितीतंत्रज्ञानासमवेत योग्य सांगड घालून ईआरपी या प्रणालींचा वापरकरीत यापूर्वीच पेपरलेस झालेल्या महावितरणने सर्व आर्थिकव्यवहार ऑनलाईन करण्याकडे प्रवास सुरु केला असून महावितरणआता कॅशलेसही झाले आहे.
महावितरणने आपल्या सर्व कंत्राटदार आणि पुरवठादारांचीदेयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास जून २०१८ पासून सुरु केलेअसून कर्मचा–यांचे वेतन, इतर भत्ते, स्थायी आणि अस्थायी अग्रीमउचल सोबतच आवश्यक कार्यालयीन खर्चाची प्रतिपूर्तीही ऑनलाईनपद्धतीने लवकरच करण्यात येणार आहे, त्याअनुषंगानेमहावितरणच्या मुख्यालयात केंद्रीय देयक अदायगी प्रणाली सुरुकरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
महावितरणमध्ये कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहारईआरपी प्रणालीद्वारे करण्यात येत असल्याने कंत्राटदाराला कामाचेकार्यादेश आणि पी.ओ. (पर्चेस ऑर्डर) ही ईआरपी मार्फ़त करण्यातयेत आहे. त्यात अधिक सुसूत्रता आणून राज्यातील सर्व कंत्राटदारांचीदेयके मुंबई येथील मुख्यालयातील केंद्रीय प्रणालीव्दारे निश्चितकालमर्यादेत ऑनलाईन पद्धतीव्दारे अदा करण्यात येत आहे.
याशिवाय कर्मचा–यांची अग्रीम उचल, वेतन आणि इतर देयकेही याचप्रकारे ईसीएस प्रणालीव्दारे कर्मचा–यांच्या बॅंक खात्यात वळतीकरण्यात येतील. यासाठी लागणारी यंत्रणा महावितरणच्यामुख्यालयात कार्यान्वित करण्यात येत आहे. ही प्रणाली पुणे आणिस्थापत्य मंडलांसाठी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली असूनत्यास मिळालेले लक्षणीय यश बघून राज्यात इतरत्रही ही पद्धतीलवकरच सुरु करण्यात येत आहे. केंद्रीकृत देयक अदायगीप्रणालीमुळे महावितरणच्या विकासकामांना अधिक गती लाभणारअसून सोबतच संपुर्ण आर्थिक व्यवहार कॅशलेस आणि पारदर्शकअसणारी महावितरण ही भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनीठरणार आहे.
