ओएलएस द्वारे गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने टेस्ट राईड घेतो असे सांगून उच्चक्षमतेच्या ( सीसी ) , मग दुपाकीच्या चोरीचे गुन्हे सायबर पोलिस स्टेशन कडून उघड

2019-04-02-20-02-26-526.jpg
Share this News:

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे अनुक्रमे दि . १८ / ०८ / २०१८ , १३ / १२ / २०१८ , २३ / ०२ / २०१९ रोजी गुरनं ४०८ / ९८ , ६६९ / १८ , १६९ / १९ अन्वये गुन्हे दाखल होते . या गुन्ह्यामध्ये ओएलएक्स या खरेदी विक्रीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चा/ ऍप्लिकेशन वापर करुन अनुक्रमे सी बीआर होंडा १५० – सीसी , यामाहा वायझेडएफ आर१५ आणि केटीएम ३९०- सी सी या वाहनांची चोरी झाली होती. तांत्रिक विश्लेषणआधारे तपास करुन वर नमूद गुन्हे सायबर पोलिस स्टेशन कडुन उघडकीस आणुन सदर दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत .

वर नमुद गुन्ह्यातील फिर्यादीनी नमुद वाहनाची जाहिरात फिर्यादीनी विक्री साठी ओएलएक्स या खरेदी विक्रीचे पोर्टलवर पोस्ट केली होती . ओएलएक्स वर अज्ञात अकाऊंट द्वारे त्यांचेशी त्यांनी विक्रीसाठी जाहिरात केलेल्या दुचाकी खरेदीसाठी चैट करण्यात आले . सदर अज्ञात अकाऊंट धारकाने त्याची ओळख ( खरे नाव , ओळखपत्र , मोबाईल नं , ईमेल आयडी ) चॅटवर उघड केली नाही . या चॅटवर त्याने फिर्यादी भेटीचे ठिकाण आणि वेळ निश्चित केली . सदर वेळी हा अकाऊंट धारक फिर्यादी यांना कात्रज चौक परिसरात भेटला. भेटल्यावर त्याने फिर्यादीना त्यांची दुचाकी त्यांनी सांगितलेल्या किमतीला भेट झाल्यावर दुचाकी आपल्याला आवडली असल्याचे सांगून त्या दुचाकीची टेस्ट राईड मागितली . फिर्यादीने टेस्ट राईड घेण्यासाठी त्याचे हवाली केले असता त्याने सदर दुचाकी चालवत घेवुन गेला व परत आला नाही त्यामुळे फिर्यादीनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला वर नमुद प्रमाणे गुन्हे दाखल केले होते .

सदर गुन्हा बाबत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन कडून सायबर पोलिस स्टेशनला सदर गुन्ह्यांत तांत्रीक विश्लेषण व तपासात मदत मिळणेकामी पत्र प्राप्त झाले होते . त्याआधारे तपार करुन वर नमुद अज्ञाताचा शोध घेवुन तांत्रिक विश्लेषण आधारे सापळा रचून गुन्हे करणारा विधि संघर्षित बालक यास ताब्यात घेण्यात आले . त्याचेकडे तपास केला असता त्याने म्युझिक वीडिओ मध्ये वापरण्याकरिता सदरचा प्रकार केल्याचे कबुल करुन तीनही दुचाकी लपविल्या ठिकाणाची माहिती दिली त्यावरुन अंदाजे ५ , ५० , ००० / – किमतीच्या या तीन दुचाकी जप्त करुन सदर विधि संघर्शित बालकासह भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या संबधित तपासी अधिका – याचे ताब्यात देण्यात आल्या .

ओएलएक्स वरुन खरेदी विक्री करताना असे प्रकार होवु नये म्हणुन नागरिकांना सायबर पोलीस स्टेशन कडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवहान करण्यात येत आहे .

वरील कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे , पोलीस उप – आयुक्त संभाजी कदम , सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके , पोलीस निरिक्षक जयराम पायगुडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , सायबर पोलिस स्टेशन चे स हा. पोलीस निरीक्षक सागर पानमंद , पो . शि . १०६०३ प्रसाद पोतदार , पो . शि . १८८९ राहुल हंडाळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील पो . शि . ९१७५ आश्विन कुमकर यांनी केली .