हमारा अपना पार्टीचे पुणे लोकसभेचे उच्चशिक्षित अधिकृत उमेदवार इंजि. राजेश अग्रवाल यांची प्रचारार्थ भव्य रॅली

Share this News:

3 April 2019 : हमारा अपना पार्टीचे पुणे लोकसभेचे उच्चशिक्षित अधिकृत उमेदवार इंजि. राजेश अग्रवाल यांची प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली . वाडिया महाविद्यालयापासून सुरु झालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते . हि रॅली रेसिडेन्सी क्लब , साधू वासवानी चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप झाला .

या रॅलीमध्ये हमारा अपना पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष पवन गुप्ता , राष्ट्रीय सचिव जयप्रकाश यादव ,राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश मित्तल ,पुणे शहर अध्यक्ष सुधीर जगताप , पुणे शहर महासचिव सचिन चव्हाण , पुणे शहर सचिव राजू परदेशी , वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष रजनीकांत पाठक , प्रीती अग्रवाल , सीमा अग्रवाल,सपना चव्हाण , आशा शिंदे ,उषा वारे , मनिषा कांबळे ,हेमलता मुरारकर आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले .