राजेश पांडे यांची प्रदेश भाजपा सचिव म्हणून नियुक्ती

68880085_2379001758832047_3151612749440614400_n
Share this News:

पुणे, ता. २२ ः राजेश पांडे यांची प्रदेश भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी मकरंद देशपांडे यांचे सहप्रमुख म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवीन जबाबदारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पांडे यांनी १९९४ ते ९७ या कालावधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राज्य संघटन सचिव म्हणून काम पाहिले आहे. १९९८ ते २००४ या कालावधीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून २००३ ते २०१३ या कालावधीत जबाबदारी पार पाडली.

नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष म्हणून २००७ पासून कार्यरत असलेले श्री. पांडे सृजन, लोकमान्य शिक्षण मंडळ, अंमळनेर, विद्यापीठ विकास मंच या संस्थांचे विश्‍वस्त आणि वनसंपदा बहुउद्देशिय मंडळाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सन २०१३ ते २०१६ या कालावधीत ते पुणे शहर भाजपचे सरचिटणीस होते.