ABVP to organise Chhatra Kranti Morcha in Pune on Monday

Share this News:

अभाविपचा शनिवारवाडा ते विधानभवन “छात्रक्रांती” मोर्चा

(पुणे-३०)- पुण्यातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांच्याविरोधात विद्यार्थ्यांच्या विविध रास्त मागण्यांसाठी अभाविप पुणे महानगरातर्फे २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ११ वाजता शनिवारवाडा ते विधानभवन असा छात्रक्रांती मोर्चा आयोजित केला आहे. यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षा, कनिष्ठ महाविद्यालय, कला, विज्ञान, वाणिज्य, पी. एच. डी. या शाखांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या व प्राध्यापकांच्या रास्त मागण्याचा यात समावेश आहे.

महाराष्ट्रातील शैक्षणिक स्थिती आपल्याला ज्ञात आहे. अनेक महाविद्यालयात पायाभूत सुविधा नाहीत, अनधिकृतपणे फीस घेऊन विद्यार्थ्यांची लूट होते, पेपर तपासणीत असंख्य घोळ होतात, निकाल वेळेवर लागत नाहीत पुनर्मुल्यांकनाचा निकाल कधी कधी पुढील पेपरच्या नंतर लागतो, शिष्यवृत्ती व EBC वेळेवर मिळत नाही. यासोबतच स्पर्धा परीक्षांबाबतीतही अनेक समस्या आहेत. खाजगी आणि अभिमत 
विद्यापीठात विद्यार्थ्यांची सर्रास लूट चालू आहे. तंत्रनिकेतन, ITI, Medical व कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. यामोर्चा मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षा, कनिष्ठ महाविद्यालय, कला, विज्ञान, वाणिज्य, पी. एच. डी. या सर्व क्षेत्रातील किमान १०,००० विद्यार्थी सहभागी होतील.

यासर्व समस्या शासनासमोर प्रभावी व आक्रमकपणे मांडण्यासाठी आणि शासनाने त्याची दाखल घेऊन ती सोडवण्यासाठी अभाविप पुणे महानगरातर्फे छात्रक्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.