आकाश एज्युकेशनल सर्विसेसच्या वतीने पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांचे मदत
मुंबई, 20 ऑगस्ट, 2019: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) च्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी (सीएमआरएफ) करिता 51 लाख रुपयांचे मदत करण्यात आली.
महाराष्ट्रात उद्भवलेल्या आपदेने दु:खी होऊन आपली वेदना आणि सहानुभूती व्यक्त करताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जे. सी. चौधरी म्हणाले की, “पूरग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. मी पूरस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे, लवकरात लवकर जनजीवन सुरळीत व्हावे.” महाराष्ट्र सरकारला या मदत आणि बचाव कार्यात साह्य करण्याकरिता त्यांनी लोकांना तसेच संस्थांना आवाहन हि केले.
मुंबई शाखेचे टीम प्रमुख डॉ. एच आर राव, रिजनल डायरेक्टर (वेस्ट), एईएसएल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननिय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) विषयी:
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) ही वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, शाळा/बोर्ड परीक्षा आणि एनटीएसई, केव्हीपीवाय आणि ऑलंपियाड्ससारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक परीक्षा पूर्वतयारी सेवा आहे. “आकाश” ब्रँड हा गुणवत्तापूर्ण परीक्षा तयारीशी आणि विविध वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या निवडीशी संबंधीत असल्याचे सिद्ध झाले असल्याचा एईएसएलला विश्वास आहे. परीक्षा तयारी क्षेत्राशी 31 वर्षांचा कार्यकारी अनुभव गाठीशी असणाऱ्या कंपनीकडे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परिक्षांच्या निवडीचा मोठा पर्याय आणि पॅन इंडिया नेटवर्कची 186 हून जास्त आकाश केंद्रे (फ्रेंचायजी सह) आणि 200,000 हून जास्त विद्यार्थी संख्या आहे.
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) ही वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, शाळा/बोर्ड परीक्षा आणि एनटीएसई, केव्हीपीवाय आणि ऑलंपियाड्ससारख्या इतर स्पर्धा परीक्षांची व स्कॉलरशीप परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक परीक्षा पूर्वतयारी सेवा आहे.