रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदी अशोक शिरोळे

Share this News:

पुणे , 18/8/2019 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) पुणे शहर अध्यक्षपदी सर्वानुमते अशोक शिरोळे, तर संपर्क प्रमुखपदी अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड १८ ऑगस्ट २०२० पर्यंत एक वर्षासाठी असणार आहे. दरवर्षी अध्यक्षपदाची धुरा बदलण्यात येणार असून, शिरोळे यांच्यानंतर विद्यमान कार्याध्यक्ष संजय सोनवणे, त्यांच्यानंतर शैलेंद्र चव्हाण अध्यक्षपद सांभाळणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत.

आरपीआय शहर कार्यालयात रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ऍड. अयुब शेख, नगरसेविका हिमाली कांबळे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, भगवानराव गायकवाड, मोहन जगताप, संजय कदम, प्रियदर्शिनी निकाळजे, निलेश आल्हाट, वसंत बनसोडे, कालिदास गायकवाड, शशिकला वाघमारे, यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यात विधानसभा निवडणुकीत एक जागा हक्काने मागून घेणार असून, योग्य उमेदवाराची निवड करून त्याला निवडून आणण्याचा निर्धार एकमुखाने यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

पदभार स्वीकारल्यानंतर अशोक शिरोळे म्हणाले, “जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे. सध्या पक्ष सत्तेत असला, तरी पुढील काळात सत्तेत वाटा मोठ्या प्रमाणात मिळावा, यासाठी पक्षवाढीवर भर देणार आहे. शहरातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढील काळात काम करणार आहे.”