कोथरूड मधील संस्था संघटनांचा चंद्रकांत दादांना उत्स्फूर्त पाठिंबा

Share this News:

17/10/2019, पुणे – मधील विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार पाटील यांना उस्फुर्त पाठिंबा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द करीत निवडणुकीतील विजयाची हमी दिली आहे.

पतीत पावन संघटनेने चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा दिला आहे. श्रीकांत शिळीमकर, पप्पू टेमघरे, तुकाराम खाडे, संतोष शेंडगे, शरद देशमुख राजू मोहोळ, सुनील मराठे, ज्ञानेश्वर साठे, अण्णा बांगर, सोपान फाले आदींनी संदर्भात निवेदन दिले आहे. सोलापूर जिल्हा मित्रमंडळातर्फे विशाल मारुती गुंड पाटील यांनी पाठिंबा यासंदर्भात पत्र दिले आहे. जनशक्ती विकास संघातर्फे अध्यक्ष मुकेश साबळे यांनी चंद्रकांत दादा पाटील पाठिंबा व्यक्त केला आहे. एमआयटी शाळा पालक कृती समितीची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत झालेल्या विकास प्रकल्पांवाबत समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच ही विकास भरारी कायम राखण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यात आला. समितीच्या वतीने अध्यक्ष अध्यक्ष संजय मोरे यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

 

स्वयंसेवक पोलीस मित्र आणि वाहतूक सल्लागार समिती कोथरूड यांच्या वतीने दादा पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. कोथरूडची विकास भरारी कायम राखण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांचे नेतृत्व मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास आम्हाला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप कुंबरे, अध्यक्ष राहुल जाधव कार्याध्यक्ष संदीप जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संस्थेने देखील पाठिंबा दिला आहे. बँड कलाकारांना पेन्शन वाहनांना परवाने आदी मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्वासन चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. जय भवानी नगर महाराजा मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे अध्यक्ष मयूर मारणे यांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. करिष्मा गृहरचना संस्थेतर्फे अभय जगदाळे व सेक्रेटरी श्रीधर देव यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा दिल्याचे पत्र सुपूर्द केले. साकार सृष्टी गृहरचना संस्थेतर्फे अध्यक्ष शुभांगी गायकवाड, रेखा भांगे आदींनी दादा पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
दरम्यान कोथरूड परिसरातील तमाम साहित्यिक कलावंत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू यांनी यापूर्वीच पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

 

प्रख्यात व्यक्ती, विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटना, तसेच विविध घटकांमधून उत्स्फूर्त वाढता पाठिंबा मिळत असल्याबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोथरूडकरांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे आपण भारावून गेलो असून त्यांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी मी सर्वतोपरीने प्रयत्न करीन असे आश्वासन चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.