Court orders police investigation against BJP corporator for fake educational certificate, affidavit

Share this News:

खोटे शपथ पत्र व खोटी शैक्षणिक कागदपत्रे दाखल केल्याच्या फिर्यादीवरून भाजप नगरसेविका लता धायरकर यांच्या विरुध्द
फसवणुकीचा फौजदारी खटला दाखल व त्वरित चौकशीचे आदेश

२०१७ च्या पुणे महानगरपालिकेतील प्रभाग २१ (ब) मधील नगरसेविका लता विष्णू धायरकर (राहणार मुंढवा )यांच्या विरोधात लष्कर न्यायालयाने फिर्यादी पूनम हर्षद बोराटे यांनी दाखल केलेल्या शासकीय व महानगरपालिकेच्या फसवणुकीबाबत फौजदारी खटला भा. द. वि. कलम १६७ , १९९ , २०० , ४०६ , ४२० , ४६३ , ४६८ व सह ३४ अन्वये त्यांच्यासह इतर साथीदाराविरुध्द लष्कर न्यायालयामध्ये फसवणुकीचा खटला दाखल करून घेउन सदर प्रकरणामध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दलची कागदपत्रांची त्वरित चौकशी करून ४ सप्टेंबर पर्यंत संबधित पोलीस स्टेशन न्यायालयाने अहवाल सादर करण्याचा हुकूम लष्कर फौजदारी न्यायालयाचे प्रथम न्याय दंडाधिकारी श्री. वाय. पी. पुजारी साहेब यांनी दिला . फिर्यादी बोराटे यांचे वतीने ऍड. प्रताप परदेशी व ऍड. महेश राजगुरू यांनी सदरचा खटला दाखल केला .
याबाबतची खटल्याची हकीकत अशी कि , येथील नगरसेविका लता धायरकर या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०१७ मध्ये प्रभाग क्र. २१ ओ. बी. सी. गटातून निवडणूक लढवून निवडून आल्या आहेत . सदर निवडणुकीच्या पूर्वी फेब्रुवारी २०१७ त्यांनी ऑनलाईन भरलेल्या उमेदवारी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता सन १९७५ साली एस. एस. सी. पास असे नमूद केलेले असून सदर कागदपत्रांमध्ये त्यांनी दाखल केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर सदर अर्जदार ह्या सन १९७४ साली एस. एस. सी.नापास असल्याचा उल्लेख एस. एस. सी.परीक्षा सन १९७५ साली त्यांनी कुठलीच एस. एस. सी.ची परीक्षा दिलेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे . सन २०१२ मध्येही झालेल्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नगरसेविका धायरकर यांनी दिलेल्या माहितीमध्ये सन १९७३ – ७४ साली ११ वी झाल्याचा उल्लेख करून आहे . दोन्ही वेळेस महानगरपालिका प्रशासन , महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग पुणे महानगरपालिका व शासकीय यंत्रणांची जाणून बुजून हेतूपरस्पर खोटी माहिती देवून विश्वासघात व फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी सिध्द झालेले असून याबाबत न्यायालयाने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून न्यायालयाने वरील आदेश दिला आहे .