डी.ई.एस. मध्ये मदत हंडी

IMG-20190823-WA0001
Share this News:
पुणे, 23 ऑगस्ट 2019 : डी.ई.एस. स्कूल टिळक रोड येथे दि. २३ ऑगस्ट २०१९ रोजी मदत हंडी साजरी करण्यात आली. मदत हंडी हा शब्दप्रयोग वेगळा असला तरी सामाजिक भान राखण्याच्या दृष्टीने दही हंडीचे औचित्य साधून पूरग्रस्तांना सदर आर्थिक मदत करण्यात आली. हंडीमध्ये, मुलांनी व शिक्षकांनी केलेल्या मदतीचे पावती पुस्तक ठेवून ही हंडी श्रीकृष्णाने फोडून समाजाप्रती आपली जबाबदारीची जाणीव राखली.
सदर कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाअंतर्गत जनकल्याण समितीचे श्री. अश्विनीकुमार उपाध्ये व श्री. विनायक डबीर यांना मुख्याध्यापिका सौ. स्मिता कुलकर्णी व सौ. ज्योती बोधे, तसेच पर्यवेक्षिका सौ. ग्रेसी डिसुझा यांनी रक्कम सुपूर्त केली. कार्यक्रमात सकाळ व दुपार सत्रात पूरग्रस्त भागातील विवंचना दृकश्राव्य स्वरूपात मांडण्यात आली.