रविवारी चिंचवड मध्ये डॉग शो देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची शहरवासियांना संधी

Share this News:

पिंपरी (दि 14 सप्टेंबर 19) पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 15 सप्टेंबर) सकाळी 9 ते सायं 6 ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक डॉग शो चे सचिव योगेश आकुलवार व पूना केनल कॉनफेडरशनचे सचिव विजय पटवर्धन यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत देश, विदेशातील वेगवेगळ्या जातीचे श्वान शहरवासियांना पाहण्यास मिळणार आहे. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 117 व 118 वी चॅम्पियनशीप स्पर्धा होत आहे. यामध्ये मायनर पपी, पपी, ज्युनियर, इंटरमेडिएट, ब्रेड इन इंडिया, ओपन, चॅम्पियन या गटात स्पर्धा होतील. भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परीक्षक संजीत कुमार मोहंती तसेच गौरी नारगोलकर हे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. देशभरातून तीनशेहून जास्त श्वानांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणा-या या स्पर्धेत देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची संधी शहर वासियांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या संयोजनात योगेश आकुलवार, सिद्धेश दर्शीले, तुकाराम सुर्वे, संजय मुत्तुर, विक्रांत भोसले, नितिन धमाले,राजेश जाधव ,कुणाल जाधव ,मनोज सोन्नीस यांनी सहभाग घेतला आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.