Fire Brigade officer going for cremation, saves cylinder blast

Share this News:

अंत्यविधीसाठी गेलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा पेटत्या सिलेंडवरवर ताबा

पुणे – वेळ दुपारी चारची _ अंत्यविधीसाठी जमलेले नातलग व मित्रमंडळी _ अचानक समोरच्या घरातून “आग आग” असा आवाज कानावर पडतो _ तिथेच नातलगांमधे अंत्यविधीसाठी आलेले अग्निशमन अधिकारी _ त्यांनी दाखवलेली तत्परताच _ !

आज दुपारी चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड परिसरातील संत तुकाराम नगर, अक्षय ययाति सोसायटीत पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी चव्हाण यांच्या नातलगांचे दुख:द निधन झाल्याने ते अंत्यविधीकरिता तेथे उपस्थित होते. त्याचवेळी समोर घरात असलेल्या रहिवाशी महिला करुणा कांबळे यांच्या घरातून अचानक एक मुलगी “आग-आग” म्हणून ओरडत बाहेर पळाली. तिथे उपस्थितांमधे असलेले अग्निशमन अधिकारी चव्हाण यांनी घरामधे असलेल्या आगीचा धोका लक्षात घेत घराकडे धाव घेतली. तिथे घरात असणाऱ्या घरगुती सिलेंडरने रेग्युलेटरच्या ठिकाणी पेट घेतला असल्याचे त्यांनी पाहिले. तातडीने त्यांनी जवळच असणाऱ्या एका ओल्या पोत्याचे साह्याने व पाण्याच्या मदतीने पेटत्या सिलेंडवर दोनच मिनिटांत ताबा मिळवला. वेळेत पेटत्या सिलेंडरवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

पुणे अग्निशमन अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी केलेल्या साहसी कामगिरीने अंत्यविधीसाठी जमलेले नातलग व मित्रमंडळी यांनी कौतुकाची थाप देत त्यांचे आभार मानले.