डॉ पी  ए इनामदार यांना मुस्लिम बँक अध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्याच्या सहकार मंत्र्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

Dr PA Inamdar
Share this News:
पुणे, 11/9/2019 : डॉ पी  ए इनामदार यांना मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक अध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्याच्या  सहकार मंत्र्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने आज ५ सप्टेंबर रोजी स्थगिती दिली आहे . २८ ऑगस्ट २०१९  रोजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सहकार आयुक्तांचा निर्णय कायम करीत डॉ पी ए इनामदार यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय त्यांच्याच  अपिलावर दिला होता . सहकार मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात इनामदार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते . त्यावर उच्च न्यायालयात न्या.एम एस   कर्णिक यांनी आज ५ सप्टेंबर २०१९ रोजी स्थगितीचा निर्णय दिला.
 डॉ पी ए  इनामदार यांच्या वतीने उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील एड .व्यंकटेश   दौंड ,एड . प्रशांत नाईक ,एड . पाटील यांनी काम पाहिले .
एस एम इकबाल ,असिफ खान ,इम्तियाझ शिकीलकर यांनी केलेल्या तक्रारींवर सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी १८ एप्रिल २०१९  रोजी इनामदार यांच्या अपात्रतेचा आदेश काढला होता .या आदेशाला सहकार मंत्री यांच्याकडे  तसेच उच्च न्यायालयात डॉ पी ए इनामदार यांनी आव्हान दिले होते . त्यावेळेस उच्च न्यायालयाने दिलेल्या  स्थगितीवर आज ५ सप्टेंबर रोजीही  पुन्हा शिक्कामोर्तब केले .