लेडी झुबेदा कुरेशी इंग्रजी माध्यमिक शाळेच्यावतीने तीन चाकी सात सायकल व एक व्हीलचेअरचे वाटप
विशाल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसंचालित लेडी झुबेदा कुरेशी इंग्रजी माध्यमिक शाळेच्यावतीने तीन चाकी सात सायकल व एक व्हीलचेअरचे वाटपअमेरिकन फेडेरेशन ऑफ मुस्लिम इंडियन ऑर्गनाझेशनचे सदस्य अलीभाई कुरेशी यांच्याहस्ते देण्यात आल्या .
हडपसरजवळील रामटेकडीमधील शाळेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास विशाल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव इरफान खान , शाळेच्या मुख्याध्यापिका महजबीन शेख , मेस्कोचे सदस्य अहमद बोरा आदी मान्यवर उपस्थित होते .
विशाल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत , त्यानिमित्त अनमप्रेम या संस्थेमधील मुलांना सात तीन चाकीचे सायकल व एक व्हीलचेअर देण्यात आल्या . अशी माहिती विशाल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव इरफान खान यांनी दिली .