लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनतर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

??

Share this News:

चंदननगर येथे लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनतर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात ६६ रक्त पिशव्या रक्त संकलित करण्यात आले .

या रक्तदान शिबिराचे उदघाटन हमारी अपनी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवनकुमार गुप्ता यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल , सचिव राजेश बन्सल , खजिनदार उमेश अग्रवाल , अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल , माया चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकेश अग्रवाल , पुणे जिल्हा रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. छाया कलाले आदी मान्यवर उपस्थित होते .

या शिबिरासाठी राजेश मित्तल , अनिल अग्रवाल , शशिकांत देसाई , सुभाष गोयल , रवी अग्रवाल , कर्नल प्रविण अग्रवाल , नीता अग्रवाल , सुरेश शिंदे , अशोक अग्रवाल , घनश्याम अग्रवाल , प्रीती अग्रवाल , रवी वानखेडे , चांद शेख , सचिन चव्हाण , विशाल अग्रवाल , कुशल मित्तल आदींनी विशेष परिश्रम घेतले .

रक्ताचे संकलन जास्तीत जास्त व्हावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे , असे मनोगत  लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले .

अग्रवाल समाजातर्फे दरवर्षी दहा हजार पेक्षा जास्त रक्त पिशव्या गोळा करण्याचे आश्वासन अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिले .

या रक्तदान शिबिरासाठी पुणे जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी व अग्रसेन डायग्नोस्टिक सेंटरने विशेष सहकार्य केले . पुणे जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी समुपदेशक संगीता गायकवाड , सचिन पवार , टेक्निशियन मनीष काळे , प्रियांका माने , परिचारिका मीरा डोंगरे , मनोज काळे आदींनी विशेष परिश्रम घेतले . तर रक्तदात्यांना अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात आले .