महाराष्ट्रअंधश्रध्दानिर्मुलन समिती  पुणे जिल्ह्यातर्फे 116 व्या महिलेला जटमुक्त करण्यात आले.

Share this News:
  10/7/2019 रोजी मु.पो.पाबळ ता.शिरूर , जि. पुणे येथील #सौकवितासाहेबराव_चौधरी यांच्या डोक्यात 9-10 वर्षापासुन जट झाली होती.तेव्हापासुन त्यांच्या अंगात येवु लागले.सौदत्ती (कर्नाटक)देवीला जाण्याचाही सल्ला त्यांना दिला त्याप्रमाणे त्यांनी तिथे जाऊन खर्च केला परंतु तिथेही त्यांची जट आपोआप सुटेल गळुन पडेल असे सांगितले पण या भोळ्या आशेपुढे ती जट काही सुटलीही नाही आणि गळुन पडलीही नाही.त्यामुळे ती जट वाढतच गेली.तसतसा त्यांना शारिरिक,मानसिक आजार वाढतच गेला.
एक वर्षापुर्वी तमाशा कलावंत मालतीताई इनामदार नारायणगांवकर व चाकण येथे केलेल्या एका महिलेच्या जट निर्मुलनाची  पेपरमधील बातमी वाचली होती. तसेच पेठ येथील पुष्पाताई पवळे यांची बातमी TV 9 वर पाहिली  #नंदिनीजाधव यांच्या मो.नं.वर संपर्क करून त्यांच्या दिराने #श्रीसंजय_चौधरी (उपसरपंच, पाबळ)यांनी संपर्क केला. त्यांना समुपदेशनाची गरज आहे.तुम्ही  घरी येवुन त्यांना समजावुन सांगु शकता का ही विनंती केली.गेल्या एक वर्षापासुन मी त्यांच्या बरोबर फोनवर सतत संपर्क करत होते.
पण आज तुम्ही या आणि जट काढून टाका असे सरपंच व त्यांचे मोठे बंधू #श्रीसाहेबरावचौधरी यांनी #नंदिनीजाधव यांना सांगितले त्यांच्या बरोबर चाकणचे अंनिसचे कार्यकर्ते #रत्नेशशेवकरी , #मनोहरशेवकरी , पाबळ शाखेचे अंनिस कार्यकर्ते #प्रशांतमेहेर उपस्थित होते.
चौधरी यांच्या घरी गेले. मनावर कसे परिणाम होतात याबाबत त्यांना होणारा त्रास त्याच्या घरच्यांना सांगून #नंदिनी_जाधव यांनी या सर्वांशी बोलुन त्यांना विचारले जट कापायची का?
स्वतः #कविताताई त्यांचे पती #साहेबरावचौधरी, दिर #संंजयचौधरी तसेच वयोवृद्ध सासू , सास-यांनी सम्मती दिली. कविताताईच्या आईशी फोन वर बोलले.त्यांनीही जट कापल्यानंतर काही होणार नाही ना! तेव्हा त्यांनाही समजावुन सांगितले.

सर्वाच्या मनाची तयारी झाल्यानंतर त्या सर्वाच्या संमतीने जट निर्मलन करण्यात आले.