पुण्यातील प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांचा इटलीमध्ये मानाच्या ‘ए डिझाईन अवॉर्ड’ने गौरव
‘ए डिझाईन अॅवॉर्ड अँड काँपिटिशन’ स्पर्धेत विविध क्षेत्रांमधील उपयुक्त व नावीन्यपूर्ण डिझाईन्सचा गौरव केला जातो. पुण्यातील सूसमध्ये असलेल्या सनीज वर्ल्ड येथे नामपूरकर यांनी कल्पक लँडस्केपिंगद्वारे पडीक दगडखाणीचे रुपांतर उत्तम अशा ‘ट्रॉपिकल लीजर डेस्टिनेशन’मध्ये केले आहे. तर वापीमधील अवध हेलिकोनिया हा एक गृहप्रकल्प आहे. या स्पर्धेत २२ देशांमधील परीक्षकांनी ३५०० स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड केली.नामपूरकर म्हणाले, ‘‘माझे वडील शेतीतज्ञ गजानन नामपूरकर यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व माझ्या मनावर कायम ठसवले. त्यामुळे वास्तुरचना आणि लँडस्केपिंग करतानाही पर्यावरणाचा विचार सर्वप्रथम करण्याची सवय मला लागली. सनीज वर्ल्ड प्रकल्पाच्या रचनेत नवीन झाडे लावण्याबरोबरच तिथले नैसर्गिक झरे वाहते कसे करता येतील याची काळजी घेण्यात आली. प्रकल्पाचे मालक व व्यवस्थापकीय संचालक विनायक निम्हण यांची या प्रकल्पासाठी मोठीच साथ मिळाली.’’