पदयात्रा काढा, कोपरा सभा, बैठक घ्या; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भाजप पदाधिका-यांना सूचना

Share this News:

प्रत्येक प्रभागातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले पाहिजे

पिंपरी, 12 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य द्यायचे आहे. बूथस्तरावर काम करुन प्रत्येक प्रभागातून जास्तीतजास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागा. पदयात्रा काढा, कोपरा सभा, बैठक घ्या, अशा सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भाजप शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी बैठक घेण्याचे सत्र सुरु केले आहे. प्रभागनिहाय बैठका घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना जगताप मार्गदर्शन करत आहेत. प्रचाराची रणनिती सांगत आहेत. प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, प्रेमलोकपार्क गुरुवारी (दि.11) आमदार जगताप यांनी चार बैठका घेतल्या. उपमहापौर सचिन चिंचवडे, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी रघुनाथ वाघ, बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, भाजपचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य द्यायचे आहे. बूथस्तरावर काम करुन प्रत्येक प्रभागातून जास्तीतजास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागा. केंद्र, राज्य आणि महापालिकेतील भाजप-शिवसेना सरकारच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहचवा. पाच वर्षात सरकारने सक्षमपणे केलेले काम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवा”

प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा. संपर्क करा. संपर्कावर भर देण्यात यावा. नव मतदारांना भाजप-शिवनेकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे नव मतदारांपर्यंत पोहचा.  मतदानादिवशी त्यांना सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर काढा. आजपासून पदयात्रा चालू करा. सगळ्या भागात पदयात्रा करा. कोपरा सभा, बैठका घेण्यात याव्यात, अशा सूचना जगताप यांनी केल्या.

नामदेव ढाके म्हणाले, “आमदार लक्ष्मण जगताप यांना नियोजनपूर्वक  प्रचार करण्याचे सूचना केल्या आहेत.  त्यानुसार आम्ही जबाबदारीने काम करत आहोत. कामाला लागलो आहेत. आजपासून पदयात्रा काढल्या जाणार आहेत”