स्पाईन रोड बाधितांच्या पुर्नवसनाचा प्रश्न निकाली, आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

Share this News:

पिंपरी, 23 ऑगस्ट – तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचा रखडलेला पुर्नवसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. 126 रहिवाशांच्या पुर्नवसनासाठी आवश्यक असलेला पेठ क्रमांक 11 येथील 6282.72 चौरस मीटर वाढीव क्षेत्रफळाचा भुखंड ‘पीसीएनटीडीए’ महापालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. त्यामुळे 14 वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न कायमचा निकाली निघाला असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पाईन रस्ता विकसित करत असताना त्रिवेणीनगर चौकातील काही घरे बाधित होत आहेत. त्या घरांचे पुनर्वसन करावे, अशी जुनी मागणी होती. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुरावा सुरु होता. बाधितांच्या पुर्नवसनासाठी प्राधिकरणाने जागा देण्याची मागणी महापालिकेने केली होती.

या रहिवाशांच्या पुर्नवसनासाठी आवश्यक असलेली प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 11 मधील 14 हजार 784 चौरसमीटर जागा यापूर्वीच प्राधिकरणाने 9 हजार 350 प्रति चौरस मीटर यादराने महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्याला देखील राज्य सरकारने आज कार्योत्तर मान्यात दिली. या भूखंडावर महापालिकेने स्पाईन रोड बाधितांचे पुर्नवसन हाती घेतले होते. तथापि, ही जागा पुर्नवसनाठी अपुरी पडत होती. त्यामुळे वाढीव जागा देण्याची मागणी आमदार लांडगे यांनी केली होती.

त्यानुसार 6282.72 चौरस मीटर वाढीव क्षेत्रफळाचा भुखंड पीसीएनटीडीएने उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार लांडगे यांनी केली होती. त्याला राज्य सरकारने आज मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राधिकरण वाढीव भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. त्यामुळे स्पाईन रोड बाधितांचा प्रश्न कायमचा निकाली निघाला असल्याचे, आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, स्पाईन रोड बाधितांच्या पुर्नवसनाचा प्रश्न 14 वर्षांपासून रखडला होता. त्यासाठी वाढीव भूखंड देण्याची मागणी सरकारकडे केली होती. या मागणीला यश आले असून बाधितांच्या पुर्नवसानासाठी प्राधिकरण 6282.72 चौरस मीटर वाढीव क्षेत्रफळाचा भुखंड महापालिकेला देणार आहे. त्याला राज्य सरकारने आज मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न निकाली लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो.

निलेश भालेकर म्हणाले, स्पाईन रोड बाधितांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. 2005 पासूनचा हा प्रश्न आहे. 2012 मध्ये त्याला आम्ही गती दिली होती. त्यावेळी स्पाईन रोड बाधितांना मिळालेल्या जागेवर मूळ मालकाने दावा दाखल केला होता. जागा देखील कमी होती. त्यामुळे वाढीव जागा देण्याची मागणी नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली.

आमदार लांडगे यांनी पाठपुरावा करुन वाढीव जागा मंजूर करुन आणली आहे. 126 नागरिक स्पाईन रोड बाधित होते. त्यामुळे आता प्रत्येक बाधित नागरिकाला 1250 चौरस फुटाचा स्वतंत्र प्लॉट मिळणार आहे. बाधित नागरिकांनी हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा सोडून दिली होती. परंतु, आमदार लांडगे यांनी अथक प्रयत्न करुन हा प्रश्न निकाली काढला आहे. त्यांनी बाधित नागरिकांचे सोने केले आहे, असेही भालेकर म्हणाले.