खासदार गिरीश बापट यांची उद्यापासून अभिवादन रॅली

Share this News:
पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्यानंतर मतदारांना अभिवादन करून आभार मानण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्या वतीने शहरात अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार मोहन जोशी यांना पराभूत करत गिरीश बापट यांनी 3 लाख 24 हजार 628 मतांनी विजय मिळवला. शहरातील जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघातून बापट यांना मताधिक्य मिळाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नगरसेवक, पाच वेळा आमदार, मंत्री आणि आता खासदार म्हणून निवड झाली. हे किर्तीमान केवळ जनतेच्या प्रेमामुळे मिळाले आहे.
हे यश माझे नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आहे. म्हणूनच जनतेचे आभार मानण्यासाठी, मतदार संघातील नागरिकांना अभिवादन करण्यासाठी ही अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. असे बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. उद्यापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. उद्या (दि. 7) कसबा आणि पर्वती, रविवारी (दि 9) कॅन्टोन्मेंट व वडगाव शेरी तर मंगळवारी (दि 11) शिवाजीनगर आणि कोथरूड मतदार संघात अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. सांयकाळी पाच वाजल्यापासून या अभिवादन रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे.