NCP organises district level Karate competition
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त भव्य जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त भव्य जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा मंगळवार पेठ येथील रवींद्रनाथ टागोर शाळेत घेण्यात आल्या . या भव्य जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धाचे उदघाटन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . या स्पर्धेमध्ये १० ते ६५ वयोगटातील स्त्री पुरुष यांचा समावेश होता . या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातून कात्रज , दौंड , लोणावळा ,बारामती , शिक्रापूर , भोर या ठिकाणावरून कराटे स्पर्धक सहभागी झाले होते .
या जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन महेंद्र लालबिगे , नीलम लालबिगे , सुरेश वाघ ,मीना पवार , शैलेंद्र लालबिगे , पुरूषोत्तम खरारे , अविनाश साळवे , मनीष साळुंके ,कुंदन मेमजादे , शैलेंद्र चव्हाण , महेश भोसले ,हेमंत लालबिगे , विशाल साळुंके, दिलीप पवार, व हेमंत खरारे आदींनी विशेष परिश्रम घेतले .