मुख्यमंत्री सहायता निधीला 1.75 कोटी रूपयांच्या देणग्या

Share this News:

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबईदि. 22 : आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी,या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाचा सन्मान राखत विविध संस्था आणि व्यक्तींनी सुमारे 1.75 कोटी रूपयांच्या देणग्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्या आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

दरम्यानआज दिवसभरात अनेक मान्यवरांनी संदेशाद्वारे तसेच दूरध्वनी करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती राम नाथ कोविंदपंतप्रधान नरेंद्र मोदीगृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहकार्याध्यक्ष जे.पी. नड्डावित्तमंत्री निर्मला सीतारामनमाजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराजकेंद्रीय मंत्री राजनाथसिंहनितीन गडकरीपियुष गोयलडॉ. हर्ष वर्धनक्रिकेटपटू सचिन तेंडुलकरअभिनेत्री मनिषा कोईरालागोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतमहाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच इतरही विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री,विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडेविधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.