महावितरणकडून ‘वाॅलेट’द्वारे रोजगाराची संधी
बारामती, दि. 18 जुलै 2019 : महावितरणने वीजबिल भरण्याच्या वाॅलेटद्वारे रोजगाराची संधी निर्माण केली असून वाॅलेटद्वारे वीजबिलांचा भरणा केल्यास प्रती पावतीमागे 5 रुपये कमिशन देण्यात येणार आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिकांना सुद्धा या वाॅलेटच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येणार आहे.
दरम्यान बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर, सातारा जिल्ह्यात व बारामती मंडलमधील बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, शिरूर, भोर तालुक्यात ठिकठिकाणी महावितरणच्या वाॅलेट नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महावितरणकडून वीजबिलांचा भरणा करण्यासाठी मोबाईल ॲपसह आॅनलाईन सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर रोजगाराची नवी संधी निर्माण करीत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने स्
वाॅलेट नोंदणीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in
महावितरण वाॅलेटमधून ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून कमिशनच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शहरी व ग्रामीण भागातील इच्छुकांनी त्वरीत महावितरणच्या संकेतस्थळावरून आॅनलाईन अर्जाद्वारे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.