PCMC, Alandi BJP corporators take oath on historic Shivneri Fort

Share this News:

*आमदार महेश लांडगे
समर्थक नगरसेवकांची ‘शपथ’*
– शिवनेरी गडावर घेतली ‘आन’
– निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराचा संकल्प

जुन्नर-: पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षातील आमदार महेश लांडगे यांच्या आळंदी आणि पिंपरी चिंचवडमधील  समर्थक नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली.

       ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर शुक्रवारी (दि २) हा शपथ ग्रहण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या सोबत आळंदी नगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील 41 नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
       भारतातील सर्वाधिक ‘श्रीमंत’ महापालिका असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालीकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता भाजपने उलथून लावली. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोघांनी भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत
(७७ जागा) मिळवून दिले. भोसरी विधानसभा मतदार सभाअंतर्गत एकूण ४४ जागांची जबाबदारी आमदार लांडगे भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलेला ‘शब्द’ पूर्ण करण्यासाठी आपले समर्थक नगरसेवकांना शिवनेरी गडावर निष्ठा व प्रामाणिकपणाची शपथ देण्यात आली.

भोसरीचा परिपूर्ण विकास आणि निष्ठा -:
भोसरीचा परिपूर्ण विकास करण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.त्यासाठी ‘भोसरी व्हिजन-२०२०’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेण्यात आले.त्याच्या पूर्णत्वासाठी महापालिकेतही भाजपची सत्ता असावी.अशी अपेक्षा होती.कारण, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे.त्यामुळे विविध विकास प्रकल्प मार्गी लावणे सोपे झाले आहे. त्यामुळे सत्तेत मश्गुल न  होता. भोसरीचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने कटिबद्ध राहावे.तसेच विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि आमदार महेश लांडगे यांच्यासोबत निष्ठेचे काम करावे. नागरिकांना दिलेला प्रामाणिक कारभाराचा शब्द पूर्ण करावा.यासाठीच ही शपथ देण्यात आली आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी गटावरील शिवाई मातेच्या मंदिरात सकाळी ७ वाजता अभिषेक केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर जेष्ठ पदाधिकारी विजय फुगे यांनी आळंदी नगरपरिषद आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांना एकनिष्ठता आणि प्रामाणिक कारभाराची शपथ दिली.    

कुसूर गावातील विकासकामांची पाहणी -:                                                                             आमदार महेश लांडगे यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ऐतिहासिक कुसूर गाव दत्तक घेतले आहे,शुक्रवारी यागावात केलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली.

” मी विधानसभा निवडणूक भोसरीच्या परिपूर्ण विकासाचे
स्वप्न डोळ्यांसमोर ठेऊन लढवली त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक- समर्थकांनी मला साथ दिली.
नागरिकांनीही माझ्या प्रामाणिक कार्यावर विश्वास ठेवला.त्याच विश्वासाने भोसरी विधानसभा  मतदार संघातील सुज्ञ नागरिकांनी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक महापालिकेत  दिले आहेत.आता आम्ही भारतीय
जनता पक्षाचे निष्ठावान शिलेदार म्हणून पारदर्शी व प्रामाणिक कारभाराची  घेतली आहे. 
– महेश लांडगे
आमदार, भोसरी