पुणे – धोकादायक भागालगत रहाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे मनपा प्रशासनाकडून आवाहन

Share this News:

पुणे वेधशाळेने अति पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला असून पुणे शहरामध्ये सध्या संततधार पाऊस पडत असल्याने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जुन्या व मोडकळीस आलेली घरे, गृहरचना संस्था/ इतर इमारतीच्या धोकादायक सिमार्भित/ संरक्षित भिंतीलगत असणारी घरे/ झोपड्या/ लेबर कॅम्प, डोंगर माथाडोंगर उतार क्षेत्राहलत नदी/नाल्यालगत तसेच अस्तित्वातील खोदकामालगत असणाऱ्या घरे/झोपड्यांना धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याचप्रमाणे सिमा्भित/ संरक्षित भिंतीलगत असणारे मातीचे भराई/मातीचे ढिगाऱ्यामध्ये पाणी मुरुन सिमार्भितीस धोका उत्पन्न होऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते. सदर धोकादायक भागालगत राहणाऱ्या नागरिकांनी त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेकरिता पुणे महापालिका प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात आहे.

तसेच धोकादायक इमारती/शेड्स/झोपड्या, जुन्या व जीर्ण तथा मोडकळीस आलेल्या बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा लगत राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका टाळण्यासाठी या मिळकतींची तपासणी करुन सदर धोकादायक इमारतीपैकी धोकादायक बांधकामाचा भाग तातडीने उतरवून घेणेबाबत संबंधित नागरिक/विकसक/मिळकतदार/वहिवाटदार/भाडेकरु यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

वास्तव्यास असलेल्या इमारती सुरक्षित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६५ अन्वये मिळकतदाराची/ वहिवाटदाराची आहे. तसेच अशा धोकादायक मिळकतीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी त्वरित स्थलांतरीत होण्याची खबरदारी घेण्यात यावी.

पुणे महानगरपालिकेकडे स्वतंत्र घरपाडी विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत असून अशाप्रकारच्या धोकादायक बांधकामाची माहिती तसेचएखादी इमारत व इमारतीचा काही भाग कोसळल्यास त्याची माहिती नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या घरपाडी विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक (०२०) २५५०१००० व (०२०) २५५०६८००/,,,४ यांचेकडे दुरध्वनीद्वारे तात्काळ कळविण्यात यावे ही नम्र विनंती.

मनपाचे अन्य महत्वाचे दुरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे

मनपा सुरक्षा विभाग २५५०११३०

मनपा अग्निशमन दल २६४५१७०७/ २६४५०६०१/ १०१

मनपा घरपाडी विभाग २५५०१३९२

मनपा पथ विभाग २५५०१०८३ (खड्डे दुरुस्तीकरिता)