लॉकडाऊन नंतर स्टार्ट अप्स वाचवण्यासाठी पुणेकर सज्ज

Share this News:

पुणे, 27 एप्रिल 2020: सध्या कोरोनाने जगात थैमान घातले आहे. भारताला देखील याचा त्रास झाला आहे. भारताला देखील कोरोनाचा फटका बसला आहे. सध्याच्या लॉगडाऊनमुळे भारतात आर्थिक अडचण येणार हे नक्की आहे. त्यामुळे पुढील अडचणींना लक्षात घेता  dealforyou.in ह्या ऑनलाईन बिझनेस डीलिंग वेब पोर्टलतर्फे भारत देशासाठी छोटीशी मदत करण्याचे ठरवले आहे. पुढील काळातील आर्थिक मंदीचा विचार करता याचा फटका जास्तीत जास्त स्टार्ट अपला बसणार आहे.

शशांक तांबे, संचालक  dealforyou.in , असे आवाहन करतो, कि सध्याच्या कोरोना पँडेमिकमध्ये प्रत्येकजण आपल्या पद्धतीने देशासाठी हातभार लावत आहे. आणि आपण देखील या देशासाठी आपण काहीतरी करावे यासाठी आम्ही स्टार्ट अप्ससाठी मोफत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण स्टार्ट अप्स वाचले तर देशाच्या आर्थिक मंदीवरील थोडा ताण नक्कीच कमी होईल. यासाठी आम्ही आमच्याकडून लोन, स्ट्रॅटेजी, फायनान्स मॅनेजमेन्ट यासाठी एक्स्पर्ट सोबत समन्वय साधून देणार आहोत.

आम्ही  dealforyou.in वेबपोर्टल असून आम्ही बिझनेस विक्री आणि खरेदीचा व्यवसाय करतो. तसेच इन्व्हेस्टमेन्ट आणि व्यवसाय वाढीसाठी नेटवर्किंगच्या दृष्टीने मदत करतो. गेल्या वर्षभरात आम्ही पन्नासहून अधिक स्टार्टअप्सला व्यवसाय मिळवून दिला असून काही स्टार्टअपला  योग्य खरेदी मिळवून दिली आहे. सध्याच्या कोरोना पँडेमिकमुळे येत्या काळात स्टार्ट अप्सला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आम्ही dealforyou.in पुढील काळात स्टार्ट अप्सकडून कोणतीच फी घेणार नाही तसेच आम्ही जास्तीत जास्त स्टार्ट अप्स मार्केटमध्ये टिकवण्यासाठी मोफत प्रयत्न करू. आम्ही आमच्याकडून स्टार्ट अप्ससाठी सर्व सुविधा मोफत देणार असून कोणतीच फी अथवा कोणतेच कमिशन घेणार नाही. जास्तीत जास्त स्टार्ट अप्स कसे टिकून राहतील यासाठी प्रयत्न करणार आहोत. साधारण आर्थिक मंदी दूर होई पर्यंत आम्ही हि सुविधा देणार आहोत.

यासाठी आमची विनंती आहे कि जास्तीत जास्त स्टार्ट अप्सने आमच्याशी संपर्क साधावा आणि  dealforyou.in ला भेट द्यावी. तसेच सुविधेचा लाभ घ्यावा.