Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

Reflection एक जापनीज अनुभव

छायाचित्रात ओरिगामी  कलेचा वापर करून बनविलेल्या कलाकृती विषयी प्रेक्षकाला माहिती देताना रोहिणी झेंडे (ओरिगामी कलाकार)

Share this News:
विशाल मुंदडा
पुणे – जापनीज भाषा आणि संस्कृती ची ओळख प्रकर्षाने करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागाचा “Reflection २०१६” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महानगर पालिकेच्या घोले रोड येथील नेहरू सभागृहात करण्यात आले होते. यात प्रामुख्याने ओरिगामी कला, भूकंपरोधक बांधकामाचे तंत्र, टोयोटो प्रोडक्शन सिस्टीम, जपानमधील वैशिष्ट्यपूर्ण बाबी, जपानी सुवर्ण मंदिर इ. विषयी प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देणारे विविध स्टोल विद्यार्थ्यांनी लावले होते.
१. ओरिगामी – या प्रकारामध्ये साध्या कागदांपासून सुंदर कलाकृती केल्या जाऊ शकतात (टाकाऊ पासून टिकाऊ) आणि त्या स्वस्तातही मिळू शकतात. याची पुरेपूर प्रचीती ओरिगामी स्टोल धारक रोहिणी झेंडे यांनी करून दिली. या स्टोल ला प्रेक्षकांची नुसती दादाच नाही मिळाली तर काही प्रेक्षकांनी आम्हाला असे बनवून देत का? अशी विचारणाही रोहिणी यांच्याकडे केली. या स्टोल मुले हे प्रदर्शन लोकांचा आकार्षांचे केंद्र ठरले.
२. टोयोटो प्रोडक्शन सिस्टीम – हे म्हणजे केवळ टोयोटो उत्पादने बनवण्याचे तंत्र नाही, तर त्यामागची मुळ कुठल्याही उत्पादकीय व्यवस्थापन कौशल्य अधोरेखित करणारा वेगळ्या प्रकारचा प्रोजेक्ट रणजीत खोजे यांनी सादर केला.
३. भूकंपरोधक बांधकामाचे तंत्र – प्रोजेक्ट बनवताना आधुनिकतेने तंतोतंत बनवलेल्या बांधकामीय नमुन्यामुळे हा प्रोजेक्ट लक्ष वेधून घेत होता. हर्षद खोले या विद्यार्थ्याने हे मोडेल बनवले होते.
या प्रदर्शनाला २ दिवसात शेकडो लोकांनी भेट दिली व जपानी तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला.
हि संकल्पना जापनीज भाषेचे विभागप्रमुख प्रज्वल चन्नगिरि यांनी राबविली. व त्यांना विभागातील काही शिक्षकांनी सहकार्य केले.
Follow Punekar News: