२५ कर्मचारी पॉझिटिव्ह, कोविड -१९ विरोधात रुबी हॉल क्लिनिक ची आक्रमक झुंज

Share this News:

पुणे, 21 एप्रिल 2020: एकीकडे कोविड -१९ ने जगाला ग्रासले असतांना तसेच आरोग्य प्रणालीवर ताण निर्माण केला असतांना रुबी हॉल क्लिनिक ने आक्रमक पद्धतीने धोरण आखले आहे . वेग, आवाका आणि स्पष्ट दृष्टीकोन ठेवत , रुग्णालय गेल्या एक महिन्यापासून प्रत्येक रूग्ण, हॉस्पिटल मध्ये भेट देणारे आणि कर्मचारी या सर्वांची तपासणी केली असून संकटाच्या वेळी सक्रिय दृष्टीकोनाचा साकारात्म प्रभाव दिसून आला आहे . “याची सुरुवात रेड झोन असलेल्या कासारवाडियारेहून आलेल्या कर्मचाऱ्याच्या एका घटनेने झाली ज्यामुळे आम्हाला त्वरित कारवाई करण्यास उद्युक्त केले. आमचे ध्येय यांच्या संपर्कात असलेल्या व लक्षण असलेल्या आणि लक्षण नसलेल्या व्यक्ती शोधून काढणे होते . जवळपास 1000 कर्मचार्‍यांची तपासणी केली असून त्यापैकी २५ पॉझिटिव्ह आहेत , सर्वाना कुठलेही लक्षण नसून त्यांची प्रकृती स्तिर आहे .

 

रुबी हॉल क्लिनिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले की यामधील पॉझिटिव्ह आढळल्यांपैकी कोणालाही सपोर्ट सिस्टीम किंवा व्हेंटिलेटर ची गरज भासली नाही. या सर्वांचे विलगीकरण केले असून ही साखळी विस्तारण्यापासून रोखले आहे .

 

करोनाव्हायरस च्या प्रसाराची साखळी यशस्वीपणे तोडणाऱ्या देशातील अनुभव सांगतो की ह्या संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांचे संसर्ग हॉब्यापासून ५-१० दिवसात शोधून विलगीकरण करण्याने या रोगास आपण रोखू शकतो . याच्या प्रतिबंधासाठी कुठलीही लस किंवा उपचारासाठी औषध उपलब्ध नसतांना , आक्रमक पद्द्ततीने तपासणी आणि संसर्ग झालेले व्यक्ती शोधून त्यांचे विलगीकरण करणे हे महत्वाचे ठरते व ह्या मुळे आरोग्यप्रणाली ही व्यत्यय येत नाहीत .

 

रुबी हॉल क्लिनिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की आमचा आमच्या , समन्वित आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनानेमुळे एकही रुग्ण या घटनेने संक्रमित झाला नाहीहे सुनिश्चित झाले . या क्षणी, १९ परिचारिका, ३ सहाय्यक कर्मचारी आणि तीन क्लिनिकल असिस्टंट्स चे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती शोधून त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत . . खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हॉस्पिटल मधील एक पूर्ण इमारत संभाव्य कोविद -१९ रुग्णांसाठी समर्पित केली आहे . नेहमीप्रमाणेच रुबी हॉल क्लिनिक तर्फे प्रभावी संसर्ग नियंत्रणासाठी कठोर निर्जंतुकीकरण असो, पीपीई आणि सक्रिय तपासणी द्वारे सर्वोच्च मानके राखत कामकाज करत आहे .