विद्यार्थ्यांनाच्या विविध समस्यांना घेऊन सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात अभाविप चे तीव्र आंदोलन

Share this News:

11/2/2020,पुणे-  पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या सर्व विषयांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शाखेच्या वतीने विद्यापीठ याठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले.

१.वसतिगृहातील अपूर्ण सुविधांची पुर्तता करणे आथवा विद्यार्थ्यांचे शुक्ल परत करणे.
२.कमवा व शिका योजनेतील शासकीय सुट्या रद्द करणे अन्यथा मानधनात वाढ करणे.
३.विद्यापीठात IBB, B.sc, B.Ed, Skill Developmentया विभागात संपूर्ण वर्षासाठी कमवा शिका योजना लागू करावी.
४.विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष उभारणे.
५.एम.फील व पी.एच.डी. च्या विद्यार्थांना फेलोशिप मिळावी.
६.दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात यावे.
७.प्राध्यापक व ग्रंथपाल भरती करण्यात यावी.

विद्यापीठ प्रशासनाने या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा अभाविप या पेक्षाही तीव्र आंदोलन करेल अशे वक्तव्य पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी या वेळी केले. कुलगुरूंनी या मागण्या मान्य करून आठ दिवसाच्या आत मागण्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. या आंदोलनावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.