Seminar on ‘Women’s empowerment- Legal side’ organised by University Women’s Association

Share this News:

पुणे प्रतिनिधी, विशाल मुंदडा

युनिव्हर्सिटी ऑफ वुमन्स असोसिएशन पुणे यांनी “महिला सक्षमीकरण – कायदेशीर बाजू” यावर त्यांच्या कार्यालयात एकदिवसीय परिसंवाद आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत पुण्याचे जिल्हा न्यायाधीश एस एन मोडक यांनी केले. महिलांबाबतीत बोलताना त्यांनी संघर्षाचे तीन टप्पे सांगितले.
ऍडवोकेट डॉ. सुधाकर आव्हाड यांनी हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये झालेल्या सुधारणांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

ऍडवोकेट उज्वला पवार यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे शारीरिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले. ऍडवोकेट रणदिवे यांनी समाजात व घरात महिलांचे संरक्षण व त्यासंदर्भात आपले मत मांडले. तसेच सामाजिक बहिष्कार यावरही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

राशिदा सय्यद यांनी घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा 2005 चा कायदा यावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच सर्व मान्यवरांनी उपस्थितांच्या प्रश्नांना देखील मनमोकळेपणाने उत्तरे दिली. आणि त्यांच्या शंकाचे समाधान केले.

पाहुण्यांनी असे परिसंवाद वारंवार घेण्याची विनंतीदेखील संयोजकांना केली.
उपस्थितांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते.