शिवाजी सुतार यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

26/8/2019 – भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) वर्ष 2008 बॅचचे अधिकारी शिवाजी मारुती सुतार यांनी मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीम्हणून आज पदभार स्वीकारला आहे. श्री शिवाजी सुतार यांनी सुनील उदासी यांच्याकडून आज पदभार स्वीकारला जे मुंबई रेल्वे विकासमहामंडळ येथे प्रतिनियुक्ति रुजू होणार आहेत.
मध्य रेल्वे वर मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्या आधी, शिवाजी सुतार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात वरिष्ठविभागीय परिचालन व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांनी ईस्ट कोस्ट रेलवे मध्ये विशाखापट्टनम स्टील प्लांट येथे एरिया मैनेजर, वॉल्टेयरविभागात विभागीय वाहतूक व्यवस्थापक, पारादीप पोर्ट चे एरिया मैनेजर या सारख्या विभिन्न पदांवर कार्य केले आहे. त्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबईविभागात विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणूनही कार्य केले आहे. श्री सुतार यांना उपनगरीय परिचालनाचा सखोल अनुभव आहे.
शिवाजी सुतार यांना रेल्वेतील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2017 मध्ये मध्य रेल्वे महाव्यवस्थापक पुरस्कार आणि वर्ष 2018 मध्येमाननीय रेल्वे मंत्री राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यांनी मुंबई विभागात उपनगरीय रेल्वे सेवा, मेल / एक्सप्रेस गाड्यांच्या संचलनात सुधारणा करण्यासाठी सक्रीय योगदान दिले आहे. त्यांनी उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे ज्यामुळे अतिरिक्त उपनगरीय सेवा चालवण्यासाठी मार्ग उपलब्ध झाला.