भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना आठवलेंनी दिल्या पाठींबा

Share this News:

पुणे, दि. १६ ऑक्टोबर, २०१९ : पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी त्यांवर रंगत चढवली. ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी, विजय आहे तुझ्या गाठीशी,” अशा शब्दांत रामदास आठवले यांनी शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काव्यातून शुभेच्छा दिल्या.

रामदास आठवले आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ शिरोळेंच्या प्रचारासाठी औंध ते खडकी बाजार अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, चिंतन शहा, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर, मुकेश गवळी, परशुराम वाडेकर, विलास पंगुडवाले, शाम काची, सुरेंद्र जी भाटी, अमित बिवाल, अमर देशपांडे, दादा कचरे, योगेश कणनायर, दत्ता सावंत, अजित पवार उपस्थित होते.

“मी इथे आलो आहे सिद्धार्थ शिरोळे यांना निवडून देण्यासाठी आणि मी इथून जात आहे तुझ्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांचा बदला घेण्यासाठी,” अशी आणखी एक चारोळी देखील त्यांनी पेश केली व शिरोळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. सिद्धार्थच्या रुपानं तरुण-तडफदार उमेदवार शिवाजीनगर मतदारसंघाला मिळाला आहे. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहा, असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना केले.

दरम्यान शिवाजीनगर परिसरात सिद्धार्थ यांच्या प्रचारासाठी एका खास मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये नगरसेविका रेश्मा भोसले आणि शिवाजीनगरमधील कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ शिरोळे यांना बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन दिले. खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, नगरसेवक गणेश घोष, समीर धुमाळ, बाळासाहेब दारवटकर, गोपाळ देशमुख या वेळी उपस्थित होते. तर औंधमध्ये आयोजित मेळावा नगरसेवक विजय शेवाळे, पुण्याचे माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.