१६ डिसेंबर पासून मुंबई विमानतळ येथून पुणे व दापोलीसाठी एस.टी.ची बससेवा सुरु होणार

Share this News:

मुंबई, 13/12/2019: प्रवांशाच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळामार्फत शिवनेरी (वातानुकूलित) व शिवशाही (वातानुकूलित) बससेवा १६ डिसेंबर,२०१९ पासून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-१ (domestic) येथून पुणे व दापोलीसाठी सुरु होणार आहे.

शिवनेरी (वातानुकूलित) बस बोरिवली – स्वारगेट च्या १७ फेऱ्या व शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली – दापोली च्या ३ फेऱ्या [प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळ येथून सुरु .होत आहेत.

प्रवाशांच्या माहितीसाठी सांताक्रूझ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-१ (domestic) येथे गाड्यांचे वेळापत्रकांचा फलक लावण्यात आला आहे; रा.प.महामंडळाचा अधिकृत लोगो असलेला फलक व रा.प. महामंडळाची वेबसाईट व टोल फ्री क्र असलेला फलक लावण्यात आला आहे; ज्या ठिकाणी रा.प. बस चढ-उतारासाठी थांबणार आहेत त्या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रवाशी थांब्याचा फलक लावण्यात आला आहे. ; प्रवाशांना माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी २ सत्रामध्ये वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे; बोरिवली नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी ०२२-२८९३१२२६/०२२-२८९७२३४८ ; ऑनलाईन तिकीट बुकिंग msrtc.maharashtra.gov.in ; टोल फ्री दूरध्वनी क्रमांक- १८००२२१२५० असा आहे.

बसचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

शिवनेरी (वातानुकूलित) बस बोरिवली – स्वारगेट , सांताक्रूझ टर्मिनस-१ (domestic) येथून सुटण्याच्या वेळा , ५.३०, ६.३०, ७.३०, ८.३०, ९.४५, १०.४५, ११.४५, १२.४५, १३.४५, १४.४५, १५.४५, १६.४५, १७.४५, १८.४५, १९.४५, २०.४५, २१.४५,
शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली – दापोली, सांताक्रूझ टर्मिनस-१ (domestic) येथून सुटण्याच्या वेळा ७.३०, २१.४५, २३.३०,

प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन एस.टी. महामंडळामार्फत करण्यात आले आहे.