मेहेतर वाल्मिकी समाजाचा विकास करणार – गिरीष बापट

Share this News:

मेहेतर वाल्मिकी समाजाचा विकास करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी -शिवसेना – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या महायुतीचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार गिरीष बापट यांनी सांगितले .

पुणे लष्कर भागात मेहेतर वाल्मिकी समाजाच्या वतीने गिरीष बापट यांच्या समर्थनार्थ मेहेतर वाल्मिकी समाज व सफाई कामगारांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे मेहेतर वाल्मिकी समाजाचे समन्वयक डॉ .अनुपम बेगी,अजय भोसले ,महेश लडकत संदीप लडकत ,अतुल गायकवाड ,किशोर शिंगवी ,मिलिंद अहिरे दादा गुलजारी चव्हाण दिनेश मेमजादे बलराम लख्खन बंडू चरण ,सोनू मेमजादे ,दादा मकवानी कैलाशकुमार दिनेश चनाल मेघराज पवार अंजु बेगी अनिता बीडलान बबलू पिहाल आदी मान्यवर उपस्थित होते .

त्यावेळी गिरीश बापट बोल्ट होते .त्यांनी सांगितले कि मेहेतर वाल्मिकी बांधवांचे प्रश्न गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत . ते प्रश्न सोडविण्यासाठी आपण मला केंद्रात पाठवावे .त्यासाठी मला आपले बहुमोल मत देउन निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले .

यावेळी मेळाव्याचे मुख्य संयोजक डॉ.अनुपम बेगी यांनी सांगितले कि उच्च शिक्षणासाठी युवकांना राज्य व केंद्र सरकारने मोफत शिक्षण दिले पाहिजे,वाल्मिकी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी . ,मुंबई मंत्रालयासमोरील वाल्मिकी चौकात भगवान वाल्मिकी यांचा पुतळा बसविण्याची मागणी सफाई कामगार आणि वाल्मिकी समाजाचा हाय पॉवर कमिटी स्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली .

या मेळाव्यात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक भारतीय जनता पार्टीचे मेहेतर वाल्मिकी समाजाचे समन्वयक डॉ . अनुपम बेगी यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक उमंदे यांनी केले तर आभार माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी मानले .