ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्याहस्ते पुण्यात उद्या उपकेंद्गांचे उद्‌घाटन

Share this News:

पुणे, दि. 18 : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील महावितरणच्या सहा वीज उपकेंद्गांचे उद्‌घाटन व भूमिपूजन राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे यांच्याहस्ते गुरुवारी (दि. 20) होणार आहे.

महावितरणच्या पायाभूत आराखडा-2 व एकात्मिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत गुरुवारी सकाळी 8 वाजता खराडी येथील झेन्सार उपकेंद्गाचे उद्‌घाटन, सकाळी 9 वाजता बोपोडी येथील माउंट वर्ट उपकेंद्गाचे भूमिपूजन, सकाळी 10 वाजता बालेवाडीमझील कन्फर्ट झोन उपकेंद्गाचे उद्‌घाटन, सकाळी 11 वाजता कोथरूडमधील राठी बेहरे उपकेंद्गाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर रात्री 7.30 वाजता पिंपरीमधील पेठकर प्रोजेक्ट व रात्री 8 वाजता तळवडे येथील देवी इंद्गायणी उपकेंद्गाचे उद्‌घाटन ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट या कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. श्री. दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री ना. श्री. विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर सौ. मुक्ताताई टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर श्री. नितीन काळजे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट – नागरिक व लोकप्रतिनिधींशी थेट संवाद – ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे हे नागरिक व लोकप्रतिनिधींशी गुरुवारी (दि. 20) संवाद साधणार आहेत. रास्तापेठ येथील महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयाच्या आवारात दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रमात नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून तक्रारी, सूचना व निवेदने स्वीकारतील व त्याचे निराकरण करणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या तक्रारी, सूचना व निवेदने लेखी स्वरुपात द्यावी. त्यानंतर विधान भवनात लोकप्रतिनिधींसोबत चर्चा व बैठक आयोजित करण्यात आली आहे.