क्रांतिगुरु  लहुजी महासंघाच्यावतीने पुणे शहरच्यावतीने ” मातंग चळवळीचा इतिहास ” या विषयावर परिसवांद

Share this News:

क्रांतिगुरु लहुजी महासंघाच्यावतीने पुणे शहरच्यावतीने ” मातंग चळवळीचा इतिहास ” महाराष्ट्र शासनाच्या दलित साहित्यातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ या विषयावर परिसवांदाचे आयोजन करण्यात आले होते . टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या परिसंवादाचे उदघाटन युवक क्रांती दलाचे समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षीं , कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ , औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा. प्रा. डॉ. सुरेश चौथाईवाले , दलित स्वयंसेवक संघाचे प्रमुख दादासाहेब सोनवणे , दलित युवक आंदोलनाचे अध्यक्ष सचिन बगाडे ,लेखक व दिग्दर्शक सुरेश पाटोळे , अशोक लोखंडे , रवी आरडे , विकास सातारकर , भास्कर नेटके आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी डॉ. कुमार सप्तर्षीं यांनी सांगितले कि , जात माणसाला वक्र दृष्ठीकडे नेते , त्यामुळे न जात हि भंकस गोष्ट आहे . कोणी जन्माअगोदर जात ठरवून जन्म घेत नाही . त्यामुळे माणसाला जोडणारा माणुसकी धर्म महत्वाचा आहे . आपण सर्वानी घराबाहेर भारतीय म्हणून राहिले पाहिजे . आपण उच्चं नीचता भेदभाव केला नाही पाहिजे . मातंग समाजामधील जुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे समाज मागे जातअसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे . आपण समाजाला या चालीरीतीतुन मुक्त केले पाहिजे . असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले .

यावेळी दलित युवक आंदोलनाचे अध्यक्ष सचिन बगाडे यांनी सांगितले कि , दलित समाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा मातंग समाज , मातंग समाजाला ज्ञानाची परंपरा आहे . मातंग समाजाला खोटा इतिहास सांगून समाजाची फसवणूक आजपर्यंत करण्यात आली आहे , त्यासाठी मातंग समाजाचा खरा इतिहास लिहावा लागणार आहे . या इतिहासाचे संशोधन करावे लागणार आहे . मातंगांची चळवळ समतेसाठी होती . परंतु अण्णाभाऊ साठेंचा खोटा इतिहास लिहला गेला आहे . त्यातून आम्हाला खलनायक ठरविण्याचे काम चालू आहे . समाजाचा लढा हा समतेसाठी आहे परंतु हा लढा दखलपात्र झाला नाही . अशी खंत त्यांनी व्यक्त केली . मातंग समाजामध्ये सामाजिक व्यवस्थेबद्दल जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे . त्यासाठी समाजाने स्वतंत्र पातळीवर पक्ष निर्माण केला पाहिजे . समाजाचे निर्माण झालेले संघटन हे एखाद्या पक्षाचे गुलाम म्हणून काम करत आहे . त्यासाठी पक्षविरहित राहून काम केले पाहिजे . चळवळीच्या स्वातत्र्यावर आपल्या ज्ञानाच्या तलवारी म्यान केल्या . त्यामुळे आम्हाला आमच्या जाणिवाच कळल्या आहेत . त्यामुळे समाजाला वैचारिक दिशा दिली पाहिजे . यापुढे दलित शोषितांचे महाराष्ट्राचे नेर्तृत्व मातंग समाज करणार आहे .

यावेळी औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा. प्रा. डॉ. सुरेश चौथाईवाले यांनी सांगितले कि , आपण मातंग समाजाचा इतिहास लिहला , खूप संघर्ष करावा लागला . परंतु अण्णाभाऊ साठे , लहुजी वस्ताद साळवे यांचे साहित्य नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . यापुढील काळात आपण लहुजी वस्ताद साळवे यांच्यावर ग्रंथ लिहणार असल्याचे सांगितले .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ यांनी सांगितले कि ,इतिहास हा अर्धवट लिहता येतो परंतु इतिहास चुकीचा लिहता कामा नये , मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीत त्यांच्याबरोबरीने काम केले आहे . त्यावेळेस अनेक परिषदा घेऊन मातंग समाजातील रूढी परंपरा अंधश्रध्देला विरोध करून शिक्षणाचे महत्व पटवून देत होते . त्याचप्रमाणे आता देखील दलित चळवळीची धुरा मातंग समाजातील कार्यकर्ते क्षमता आहे .

य कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत एकनाथ चांदणे यांनी केले सूत्रसंचालन आतिष कापसे यांनी केले तर आभार शैलेश आवळे यांनी केले . या कार्यक्रमाच्या संयोजनसाठी अण्णासाहेब वस्त्रद, संतोष घोलप , सचिन नवघिरे , बाळासाहेब मोहिते , मालती अवघडे , अमोल गायकवाड , आकाश कासार ,

संतोष सरोदे आदी विशेष परिश्रम घेतले .