“नवीन तंत्राञान व जागृकेमुळे मधुमेहावर नियंत्रण आणता येते” 

Share this News:

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट तर्फे दुसऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेस’ सुरुवात

मधुमेहावर उपचार करणारे एक अग्रगण्य हॉस्पिटल असलेल्या चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट तर्फे दुसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद आजपासून हॉटेल जे डब्लू मॅरीयेट, पुणे येथे सुरु झाली आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन इंटरनॅशनल डायबेटिस फेडेरेशन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.अँड्रयू जेएम बॉलटन यांच्या हस्ते झाली.

मधुमेह व त्यामुळे होणारे विविध आजार व त्यावरील उपचार या विषयी चर्चा करण्यासाठी अनेक जागितक किर्तीचे तज्ज्ञ डॉक्टर व संशोधक या परिषदेमध्ये भाग घेत आहेत. याशिवाय या परिषदेमध्ये जगभरातील नामवंत संस्था जसे कि कॅरोलिन्सका इन्स्टिटयूट, गोथेनबर्ग विद्यापीठ, मेयो क्लिनिक, फ्लोरिडा विद्यापीठ(यु.एस.ए), लंडन व मॅन्चेस्टर विद्यापीठ(इंग्लंड), टयूरीन विद्यापीठ (इटली), यातील १५ तज्ञ भाग घेत आहे.भारतातून ५० डाएबेटीस विशेषज्ञ व संशोधक आपले संशोधनपर निबंध सादर करणार आहेत. त्याचबरोबर भारतातील १८०० डॉक्टर्स परिषदेला उपस्थित राहणार आहेत. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटने या वर्षापासून चेलाराम फाउंडेशन डाएबेटीस रिसर्च अवॉर्ड ची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना इंटरनॅशनल डायबेटिस फेडेरेशन अध्यक्ष डॉ.अँड्रयू जेएम बॉलटन म्हणाले की ” गेली अनेक वर्षापासून मधुमेह हा भारतातील एक दुर्धर विकार बनला आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, चुकीचे राहणीमान यामुळे मधुमेह होण्याचा धोका असतो. योग्य काळजी मधुमेह होण्याचा धोका टाळता येतो.तसेच नवीन तंत्राञान व जागृकेमुळे मधुमेहावर नियंत्रण आणता येते”

चेलाराम डायबिटिज इन्स्टिट्यूटचे चेअरमन श्री. लाल एल चेलाराम म्हणाले की, ” चेलाराम मधुमेह संस्था नेहमीच मधुमेह आणि त्याची गुंतागुंत टाळण्याकरिता लढण्यात आघाडीवर राहिली आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेने वैद्यकीय समाजाला या विनाशकारी आजाराशी लढा देण्याकरिता आमच्या प्रयत्नांचे एक उदाहरण दिले आहे. ”

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख एन्डोक्रिनॉलॉजीस्ट डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन म्हणाले की “भारतात मधूमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांचे प्रमाण दिवसान दिवस वाढत आहे.यावर जगातील नवीन तंत्राण्यानाच्या माध्यमातून कशा प्रकारे उपचार करता येईल याची माहिती भारतातील सर्व डॉक्टराना उपलब्ध व्हावी तसेच मुधुमेहावर नियंत्रण आणण्यास मदत व्हावी यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.”