मोहसिन शेख खुन खटल्याची सुनावणी 7 जानेवारी 2016 पासून नियमित पणे सुरू होणार

Share this News:

पुणे—फेसबुकवर शिवाजी महाराजांची बदनामी केली व त्या नंतर पुणे येथे हडपसर भागात दंगल उसळली होती व त्या दंगलीत इंजिनिअरींगचा विद्यार्थी असलेला मोहसिन शेख याचा खून झाला होता..त्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई सह 22 आरोपी अटकेत आहेत.

त्यातील एक आरोपी अक्षय दत्तात्रय सोनवणे वय 19 हा महाविदयालयीन  विद्यार्थी असुन त्याला जामीन मिळावा असा अर्ज अॅड मिलींद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात केला होता.

दि 23/12/15 रोजी आरोपी अक्षय सोनवणे याचा जामीन अर्ज न्यायाधीश जे टी ऊत्पात यांनी नामंजूर केला व हडपसर पोलिसांना व जेल अधिक्षक यांना आदेश दिले की 7 जानेवारी 2016 रोजी सर्व आरोपींना आरोप निश्चिती साठी उपस्थित ठेवावे.

हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख असलेला धनंजय देसाई व त्यांच्या समवेत 22 आरोपी कारागृहात आहेत व सर्वांचे जामीन अर्ज यापुर्वीच पुणे सत्र न्यायालयाने व मुंबई ऊच्य न्यायालयाने फेटाळले आहेत.

दीड वर्षा पासुन सर्व आरोपी कारागृहात असुन दोषारोप निश्चिती करून सुनावणी सुरू करावी अशी विनंती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.

या खटल्यात हिंदु राष्ट्र सेना चे अध्यक्ष धनंजय जयराम देसाई वय 34 रा हिंदुगड मुळशी जि पुणे व इतर 20 आरोपी  दि 03/06/2014 पासुन अटकेत व कारागृहात आहेत.

फेसबुक वर शिवाजी महाराजांची बदनामी केली हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याने दि 2 जुन 2014 रोजी हडपसर पुणे भागात दंगल उसळली होती. व त्या दंगलीत इंजिनिअरींगचा विद्यार्थी असलेला मोहसिन शेख मोहम्मद सादीक वय 28 मुळ रा सोलापूर व सध्या रा हडपसर याचा मृत्यू झाला होता.

दंगली नंतर मोहसिन शेख चा भाऊ शेख मोबीन मोहम्मद सादीक वय 26 रा हडपसर याने 7 ते 8  अनोळखी आरोपी विरोधात हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

न्यायालयात अॅड मिलींद पवार, अॅड सचिन हिंगणेकर व अॅड गणेश सोनावणे यांनी आज न्यायालयात आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला तर सरकारकडून अॅड ऊज्वल निकम यांनी युक्तिवाद केला.

अॅड मिलींद पवार यांनी युक्तिवाद करताना सांगितले की शिवाजी महाराजांची फेसबुकवर बदनामी झाली व ऊत्सुफुरतपणे हिंदु युवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. कोणाच्या खुनाचा कट केला नव्हता किंवा कोणाच्याही खुनाचा ऊद्देश नव्हता,  फक्त आंदोलन सुरू असताना दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली व अचानक दगडफेक सुरू झाली व त्या मधे दगड लागुन मोहसिन शेख चा मृत्यू झाला.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड ऊज्वल निकम यांनी लेखी अर्ज देऊन सांगितले की या आरोपींनी जातीय दंगल घडवून मोहसिन शेख याचा खून केला आहे, बेकायदा जमाव जमवुन मालमत्तेचे नुकसान केले आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या विरोधात प्रचार केला व पत्रके वाटली, व मुस्लिम समाजाचा बदला घेण्यासाठी चिथावणी दिल्या, मुस्लिम समाजाच्या व्यक्ततीचा खुन केला.

मुस्लिम समाजाच्या लोकांच्या दुकानाची तोडफोड केली व हिंदू राष्ट्र सेनेची दहशत रहावी म्हणून वरिल आरोपींनी कटकारस्थान केले व म्हणून न्यायालयाने वरिल सर्व आरोपीवर भादवि 143, 147, 148 ,149, 307, 302 ,120 (ब) अन्वये दोषारोप निश्चित करण्यात यावेत असा दोषारोप निश्चितीचा 9 पानी अर्ज सरकार पक्षातर्फे यापूर्वीच दाखल केला आहे.

या खटल्यातील काही आरोपी कोल्हापूर येथील कारागृहात आहेत त्यांना न्यायालयात हजर करण्यात यावे असा अर्ज या पुरविच अॅड मिलींद पवार, अॅड सचिन हिंगणेकर व अॅड गणेश सोनावणे यांनी केला आहे. न्यायालयाने अर्ज मंजूर केला आहे व दि 7/1/15 रोजी सुनावणी नियमीत सुरू करण्या साठी व दोषारोप निश्चिती साठी सर्व आरोपींना हजर ठेवण्याचे आदेश दिले.