Jay Ghosh Rally जय घोष फेरी चे संपन्न

Share this News:

‘भारत माता की जय’ या जयघोष फेरी ची आयोजन आज (दि.२० मार्च २०१६) करण्यात आले होते. सकाळी १०:०० वा. हि फेरी भिडे पुलाजवळील डेक्कन चौपाटी येथून सुरु होऊन –  छ.संभाजी महाराज पुतळा मार्गे संभाजी पुलाच्या अलीकडे (खंडोजी बाबा चौक) येथे सकाळी ११:०० वा.सामुहिक राष्ट्रगीत म्हणून संपन्न झाली. फेरी दरम्यान भारत माता की जय हि एकच घोषणा देण्यात आली. या उपक्रमात सुमारे १२५-१४० तरुण मित्रांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे हा उपक्रम कोणत्याही संस्था व संघटनेने आयोजित केला नव्हता. सोशल मिडिया च्या माध्यमातून मित्रांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला.

भारत माता की जय अभिमानाने म्हणा भारत माता की जय……कारण ??? देशाला आई संबोधणे हा देशाचा सन्मान आहे आणि ती भारतीय संस्कृतीची महानता आहे. आणि विशेष म्हणजे संविधानिक मूल्यांना बळकट करणारी भावना सुद्धा आहे. देशाला आई म्हटले की देशाचे नागरिक तिची मुलं ठरतात आणि आपण सर्व बांधव आहोत आपण बंधुत्वाच्या भावनेने व्यवहार करायला हवा हा संदेश भारत माता की जय या जयघोषातून अभिव्यक्त होतो. समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय निर्माण होणे आणि टिकणे हे केवळ बंधुत्वाच्या-आपुलकीच्या भावनेनेच शक्य आहे. आम्ही शाळेत असल्यापासून राष्ट्र्गीतानंतर भारत माता की जय म्हणत आलो आहोत. हि घोषणा काय कोणत्याही राजकीय पक्ष वा संघटनेची जागीर नाहीये. सर्व भारतीयांच्या आईची व देशाची ती ओळख आहे. १८८२ साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ कादंबरीत ‘वंदे मातरम’ लिहिले आणि नंतरच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात शेकडो क्रांतिकारक वंदे मातरम चा जयघोष करत फासावर गेले. पण काही लोकांना या घोषणांची अलर्जी का होत आहे?? हा प्रश्न आम्हाला सतावतोय. देश तोडण्याची, देशाच्या बर्बादिची आणि भारत माता की जय म्हणणार नाही अशी भाषा करणारे कोण आहेत?? हे मुठभर फुटीरतावादी, अराजकवादी, जहाल डावे, माओवादी आहेत. हे सध्या फक्त बुद्धीभेद आणि द्वेष पसरवण्याचे षडयंत्र करताहेत. यांचे हे कुटील डाव नक्कीच हाणून पाडू. आणि सामाजिक समता, बंधुभाव, एकता निर्माण करण्यासाठी सकारात्मकतेने सक्रीय होऊ. भारत माता की जय.