अविनाश पाटील व पं.राजेंद्र कंदलगावकर यांच्या दुबई,लंडन आणि युरोपियन देशात संगीत मैफिली

Share this News:

(पुणे) सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खंडाळी या छोट्याशा गावातून संगीत कलेत करिअर करण्यासाठी सुमारे पंधरा वर्षापूर्वी पुणे येथे येवुन , प्रचंड संघर्ष करून संगीत क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे अस्तित्व उभा करित आज संपूर्ण विश्वाला आपल्या तबला वादनातुन साद घालु पाहणाऱ्या युवा तबला वादक अविनाश पाटील व प्रसिद्ध गायक पं.राजेंद्र कंदलगावकर यांचा १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान जवळ जवळ दहा देशात तबला वादन व गायन मैफिलींचा कार्यक्रम दौरा होत आहे.अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार ते या निमित्ताने करणार आहेत.यामध्ये नेदरलँड,स्पेन,स्कॉटलॅड,न्यू कास्टेल, लंडन,डेनमार्क, जर्मनी,पोलंड, स्विझर्लंड, दुबई, या देशांचा समावेश आहे.यामध्ये विविध देशातील महाराष्ट्र मंडळ,स्थानिक संस्था,सुरहिंडोल, व भारत सरकार च्या सहयोगाने आय.सी.सी..आर अंतर्गतही काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आंतराष्ट्रीय ख्यातीचे गायक पंडित राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन व अविनाश पाटील यांचे तबला वादन असे सर्व ठिकाणी मैफिलिंचे स्वरूप असणार आहे. पं.कंदलगावकर यानी पं.विष्णुपंत घाग यांचे कडे प्राथमिक शिक्षण घेतले आहे.त्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे कडे गायनाची तालीम घेतली आहे.संगीत अलंकार या परिक्षेत भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकवला..त्यानी सवाई गंधर्व महोत्सवासह जगभरातिल अनेक संगीत महोत्सवात सादरिकरन करुन रसिकांचि दाद मिळवली आहे.

ते आकाशवाणी व दुरदर्शन चे अ श्रेणी प्राप्त कलाकार आहेत.पं.रामकृष्ण वझेबुवा पुरस्कार,सुरमणी किताब त्याना मिळाले आहेत. अविनाश ने तबला वादनाचे शिक्षण प्रख्यात तबला वादक गुरु वडील पंडित प्रमोद पाटील व सुप्रसिद्ध तबला वादक पंडित उमेश मोघे यांचेकडे घेतले आहे. पाटील यांना पुणे विद्यापिठाचे तबला वादन विषयासाठी सुवर्णपदक मिळाले आहे. त्यासोबत त्यानी तबला अलंकार हि पदवी प्राप्त आहे. अविनाशने आजपर्यंत सवाई गंधर्व संगीत महोत्सव, स्पिक मॅके, अष्टविनायक संगीत महोत्सव,उस्ताद आमिर हुसेन खाँ संगीत महोत्सव, पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव,अशा उच्च स्तरीय आंतराष्ट्रीय संगीत महोत्सवात सादरीकरण केले आहे. दुरदर्शन, ई टी व्ही, इनसिंक , साम टिव्ही, झी टी व्ही अशा विविध टी व्ही चॅनेलवर त्यांचे तबला वादन झाले आहे.पद्मभूषण पं. राजन साजन मिश्रा, पं. व्यंकटेशकुमार, पं. रोणू मुजुमदार,पं.जयतिर्थ मेऊंडी, सानिया पाटणकर, मंजिरी आलेगावकर,पं.विजय कोपरकर, पं. श्रीनिवास जोशी, पं. मोहनकुमार दरेकर,पं.शौनक अभिषेकी, पं.यादवराज फड, पं. संजय गरूड ,पं.रघुनंदन पणशीकर ,पं.राजेंद कुलकर्णी अशा आंतराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज कलाकारांना तबल्याची साथसंगत दिली आहे.

त्याना उस्ताद इनाम अलि खान पुरस्कार, बेस्ट तबला परफॉरमर पुरस्कार ,स्वामी विवेकानंद पुरस्कार, राष्ट्र गौरव पुरस्कार, मुक्ताताई गौरव पुरस्कार, कलाउपासक पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, तालमणी पुरस्कार, आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.खंडाळि सारख्या एका लहानशा खेड्यातुन येवून अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतुन वाट काढत,प्रचंड संघर्ष करुन,जिद्दीने,चिकाटीने,अहोरात्र मेहनतिने,सचोटीने,अखंड रियाजाने,प्रामाणिकपणे,आई वडील व गुरु कृपेने पुणे व राष्ट्रीय स्तरावर त्याने संगीत क्षेत्रात स्वताच्या नावाचा स्वतंत्र असा वेगळा ठसा उमटविला आहे.