महाराष्ट्रातील सर्व पेट्रोल पंपवरील शौचालय सर्व महिलांसाठी उपलब्ध होणार

Share this News:

27/8/19:

ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश अन्न व नागरी पुरवठा विभागाने सर्व पेट्रोल पंपांना दिल्या सूचना

महिलांना शौचालयबाबतीत कुचंबणा होत असते. याबाबत उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे या सातत्याने पाठपुरावा करत असून ग्रामविकास, परिवहन, अन्न व नागरी, मुंबई महानगरपालिका यांच्यासोबत बैठक घेतल्या आहेत. मागील बैठकीत पेट्रोल पंपांवर सर्व महिलांसाठी त्यात ग्राहक असो व नसो त्यांना पेट्रोल पंपावर शौचालय वापरण्यासाठी देण्यात यावे अशा निर्देश दिले होते. यावर अन्न व नागरी विभागाने तात्काळ कारवाई करत सर्व पेट्रोल पंपावर शौचालय उपलब्ध करून देण्यात यावे याबाबत पेट्रोलियम असोसिएशनला आदेश दिले आहेत. याबाबत ना.डॉ.गोऱ्हे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे श्री मनोज सूर्यवंशी यांचे आभार मानले.

आज दि.२७ ऑगस्ट, २०१९ रोजी ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महिलांना शौचालय उपलब्ध करून देण्यात याबाबत ग्रामविकास प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, शेखर चन्ने परिवहन आयुक्त, कुलकर्णी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, मनोजकुमार सूर्यवंशी सह सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग, प्रियदर्शन कांबळे-अवर सचिव ग्रामविकास यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरी आणि ग्रामीण भागात महिलांना शौचालय उपलब्ध आहेत त्याठिकाणी सूरक्षितेबाबत खिडक्याना काचासोबत बाहेर बाजुने जाळ्या बसविण्यात याव्या जेणे करुन काचा बाहेरुन फोडणे घडणार नाही. पाणी उपलब्ध करून देण्यात यावे ध सॅनिटरी नँपकीनची विल्हेवाट करण्याबाबत मशिनरी बसविण्यात यावी, स्वच्छता ठेवण्यात यावी अशा सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

ज्या गावात आठवडी बाजार आहेत त्याठिकाणी मोबाईल शौचालय उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश ना.डॉ.गोऱ्हे यांनी ग्रामविकास विभागास दिल्या. शाळा, ग्रामपंचायत, तलाठी सज्ज तसेच सार्वजनिक ठिकाणी महिला जे काम निमित्ताने यात असताना त्यासाठी स्वच्छताघरे निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात यावे अशी सूचना देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली.

तसेच परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चन्ने यांना परिवहन कार्यालयात ज्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाहीत अशा ठिकाणी तात्काळ शौचालय निर्माण करण्यात यावेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री कुलकर्णी यांच्यासमोर या बैठकीला उपस्थित असलेल्या महिलांनी ग्रामीण बसथांब्यावरील भागातील शौचालयाची दुरावस्थे बाबत प्रश्न मांडले. यावरती ना.डॉ.गोऱ्हे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी यांनी शौचालयचा आढावा व सुधारणा अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले. १०० शौचालय नूतनीकरण करण्याचा आराखडा महामंडळाने घेतला आहे त्याबाबत कंपनी नेमण्यात आली असून २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल असे श्री कुलकर्णी यांनी याबैठकीत सांगितले.याखेरीज सेवा सुधारणा दुरध्वनी सेवा क्रमांक देण्णत यावा असाही निर्णय झाला.

याबैठकीत असीमकुमार गुप्ता यांनी ग्रामविकास विभागाच्या घरकुल योजने संदर्भात माहिती दिली. यात जे नागरीक शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहेत त्यांनी दि.१८ फेब्रुवारी, २०२० च्या आत ग्रामविकास विभागाकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान उपस्थित महिलांना ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती दिली.

यावेळी ज्योती ठाकरे- अध्यक्ष माविम, शिवसेना महिला जिल्हा संघटिका सखुबाई लटपटे, शोभा बेंजरगे, रेखा ठाकरे, स्वाती ढमाले, right to pee च्या सुप्रिया सोनार, मुमताज शेख, महानंदा चव्हाण, अल्का माटे, वैशाली कांबळे, शुभांगी शेलार, कल्पना पाटील आदी मराठवाडा, विदर्भ,कोकण,आदि महाराष्ट्रच्या विविध भागातून महिला कार्यकर्त्या या बैठकीला उपस्थित होत्या.