मुलींमधील तिरळेपणा दूर करून नेत्रसेवा प्रतिष्ठानचे आगळे वेगळे ‘गौरी पूजन’!

Share this News:
पुणे, 12/9/2019 : तिरळेपणातून निर्माण होणाऱ्या विवाह जमण्यापासून  समाजात  वावरण्यापर्यंतच्या समस्या ,न्यूनगंडातून मुलींची सुटका करण्यासाठी आणि त्यांना नवे आत्मविश्वासपूर्ण जीवन देण्यासाठी ‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान ‘ ने  डोळ्यांच्या तिरळेपणावरील  मोफत उपचार शिबीर पुण्यात आयोजित केले आणि आगळेवेगळे ‘गौरी पूजन ‘ साजरे केले ! समाजातील कन्या या ‘गौराया ‘ मानून त्यांचे सक्षमीकरण या उपक्रमातून केले गेले आहे  
गौरी -गणपती पाहण्यासाठी राज्यभरातून  पुण्यात येणाऱ्यांचे वाढते प्रमाण पाहता गणेशोत्सव काळातच दरवर्षी हे शिबीर आयोजित केले जाणार आहे .
रविवारी हरजीवन हॉस्पिटल(सारसबाग) मध्ये झालेल्या या अनोख्या उपक्रमाला ,शिबिराला राज्यभरातून  चांगला प्रतिसाद मिळाला .मुलींसहित २१० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला . मुलींव्यतिरिक्त लहान बालके ,ज्येष्ठ नागरिकदेखील उपचार घेण्यासाठी  आले होते .ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ मधुसूदन झंवर यांच्या नेतृत्वाखाली  १० डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले .
‘लायन्स क्लब’चे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते उदघाटन केले.डॉ सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले .डॉ ओमप्रकाश पेठे ,’हरजीवन ‘ हॉस्पिटलचे  डॉ मनोहर शेठ यांनी छोटेखानी भाषणातून या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले .
‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान’ तर्फे ३५ वर्षे तिरळेपणावर मोफत उपचार करण्याचा उपक्रम चालविला जात आहे . राज्याच्या २३ जिल्ह्यात ही उपचार शिबिरे झाली असून २५ हजार हून अधिक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि तिरळेपणाच्या वैगुण्यातून सुटका करून आत्मविश्वासपूर्ण जीवन जगायला सुरुवात केली आहे ,’असे डॉ सतीश देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले .
   डॉ राजेश पवार यांनी आभार मानले . यावेळी डॉ संपत पुंगलिया ,रवी चौधरी डॉ पारस शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते