रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर सचिवपदी राजेश गाडे यांची नियुक्ती

Share this News:

पुणे, २५ अगस्त २०१९ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर सचिवपदी राजेश रमेश गाडे यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर अध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिले .

 

`राजेश गाडे हे गेली दहा वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये कार्यरत असून फुले , शाहू , आंबेडकर चळवळीत गेली अनेक वर्षांपासून काम करीत आहे त्यांनी सात वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघावर सरचिटणीसपदी काम केले आहे . दलित अल्पसंख्याक सेवा प्रतिष्ठानच्या सहसचिव, शिवराम तरुण मंडळाच्या ट्रस्ट सल्लागार , शिवशक्ती – भीमशक्ती प्रतिष्ठानच्या सरचिटणीस व ऍड राहील मलिक युवा मंचावर प्रवक्ता आदी पदांवर कार्यरत आहे .

 

या पदाच्या नियुक्तीनंत आपण पक्ष वाढीसाठी भर देणार असून जास्तीत जास्त तरुणांना पक्षात सामील करून घेणार आहे . असे त्यांनी आपल्या नियुक्ती नंतर सांगितले .