अपंगाच्या विशेष शाळा/कर्मशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती सदस्य पदांसाठी अर्ज करावेत
उस्मानाबाद, दि. 13 :- स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगाच्या विशेष शाळा/कर्मशाळांचा दर्जा सुधारण्याकरीता जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठित करण्यासाठी अपंग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबाबतचे राज्य/केंद्र शासनाकडून पुरस्कार प्राप्त केलेल्या जिल्हयातील चार अपंग व्यक्तींची जिल्हास्तरीय नियंत्रण समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करावयची आहे. काम करण्यास इच्छूक व्यक्तींनी दिनांक 26 डिसेंबर 2016 पर्यंत अपंग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबाबतच्या प्रमाणपत्रासह समाज कल्याण विभाग , जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. के. मिनगिरे यांनी केले आहे.