Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

‘अप्पलाऊड’ स्वयंसेवी संस्थेला ‘राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार’

4 May 2019, पुणे :
‘अप्पलाऊड’ स्वयंसेवी संस्थेला ‘राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तृतीयपंथीयांच्या सबलीकरणासाठी संस्थेच्या अनुकरणीय योगदानासाठी ‘असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट’ च्या वतीने नुकताच हा गौरव केला, अशी माहिती संस्थेचे संस्थापक रिदम वाघोलीकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
या गौरव कार्यक्रमांतर्गत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि कलाकार अभिजित खांडेकर यांना देखील सन्मानित करण्यात आले.
तृतीयपंथीयांच्या समस्या आणि सबलीकरणासाठी ‘अप्पलाऊड’ ही संस्था रिदम वाघोलीकर यांनी सुरु केली आहे. तृतीयपंथी कार्यकर्त्या श्री गौरी सावंत या संस्थेच्या अध्यक्ष तर संगीता शेट्ये सचिव, प्रतीक रोकडे खजिनदार आणि राहुल कोटगळे हे संपर्क प्रमुख आहेत.
तृतीयपंथींच्या समोरील शैक्षणिक आव्हाने, समस्या आणि संक्रमणासाठी उपाय योजना हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेऊन ही संस्था स्थापन करण्यात आल्याचे , संस्थापक रिदम वाघोलीकर यांनी सांगितले.
‘अप्पलाऊड’ संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाला सक्षम, प्रेरित करणे आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत करत आहे. तसेच ही स्वयंसेवी संस्था त्यांना सुशिक्षित करणे, सामाजिक स्वीकृतीचा हक्क मिळवून देणे, विविध कंपन्या आणि तृतीयपंथी यांच्यातील दुवा होऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे कार्य करत आहे. तसेच तृतीयपंथी आणि समाज यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण होण्याकरिता संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, असे तृतीयपंथी कार्यकर्त्या श्री गौरी सावंत यांनी माहिती देताना सांगितले.