Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

एशियन आर्किटेक्चरल रुकीज अवॉर्ड – २०१९ साठीच्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत पीव्हीपीसिओचे यश

पुणे 15/9/2019 : व्ही आय टी पीव्हीपी कॉलेज आॅफ आर्किटेक्चर यांच्या तर्फे आयोजित एशियन आर्किटेक्चरल रुकीज अवॉर्ड – २०१९ साठीच्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत पीव्हीपीसिओचे सोमेश काचावर आणि अभिजीत परदेशी यांनी रौप्य पदक पटकाविले. जपानचे प्रो. डॉ. याँग ली यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली.

या स्पर्धेत भारतातील पाच राज्यातील २४ महाविद्यालयाच्या एकूण ४३ विद्यार्थांनी सहभाग घेतला. मानव आणि निसर्ग यांच्यातील सहजीवन या विषयावरील वास्तुकलेची आरेखने स्पर्धेत सामील होती. के. आर. व्ही. ए. मुंबई महाविद्यालयाची संजना पांडे आणि रचना संसद महाविद्यालयाचा जयेश शर्मा हे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले, तर बी. के. पी. स.महाविद्यालयाचा अभिषेक क्षीरसागर याने देखील रौप्य पदक पटकाविले.

यावेळी पीव्हीपीसिओएचे प्राचार्य आर्की. प्रो. प्रसन्न देसाई, व्ही आय टी संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया, संस्थेचे मार्गदर्शक आर्की. विकास भंडारी उपस्थित होती. स्पधेर्चे आयोजन महाविद्यालयाच्या पिरंगुट कॅम्पस मध्ये करण्यात आले होते. सुवर्ण पदक विजेत्याला मानचिन्ह व पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

प्रो. प्रसन्न देसाई म्हणाले, या स्पधेर्तील दोन सुवर्ण पदक विजेत्यांना टोकियो जपान मध्ये १ ते तीन नोव्हेंबर मध्ये आयोजित करण्यात येणाºया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

सचिव जितेंद्र पितळीया म्हणाले अशा प्रकारच्या राष्ट्रीय संस्थेचे आयोजन करण्याची संधी महाविद्यालयाला मिळाली हि अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेच्या परिक्षकांमधे भारतातील १० नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा समावेश होता. टोकियो मधील अंतिम स्पर्धेत भारतासह आशिया खंडातील मलेशिया, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, जपान, व्हिएतनाम या देशातील वास्तुकलेचे विद्यार्थी सहभागी होतील.